Banana Rate : केळी दरात घसरण सुरूच

Banana Market : मध्य प्रदेशातील बाजारात केळीच्या आवकेत मोठी वाढ झाल्याने खानदेशात शिवार किंवा थेट खरेदीत केळी दरात मागील १२ ते १५ दिवसांत एक क्विंटलमागे ११०० ते १००० रुपयांची घट झाली आहे.
Banana Rate
Banana RateAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : मध्य प्रदेशातील बाजारात केळीच्या आवकेत मोठी वाढ झाल्याने खानदेशात शिवार किंवा थेट खरेदीत केळी दरात मागील १२ ते १५ दिवसांत एक क्विंटलमागे ११०० ते १००० रुपयांची घट झाली आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात लिलावामध्ये जे दर केळीस मिळतात, त्याच दरात खानदेशात केळीची शिवार किंवा थेट खरेदी केली जाते. बऱ्हाणपुरात केळीची आवक सतत वाढत आहे. तेथील आवक २२७ ट्रकपर्यंत (एक ट्रक १६ टन क्षमता) मागील शनिवारी (ता. २८) पोहोचली होती. ही आवक मागील पंधरवड्यात ११० ते १२० ट्रक प्रतिदिन अशी होती. खानदेशात केळी आवकेत फारशी वाढ झालेली नाही. परंतु नजीकच्या राज्यातील बाजारात केळीची आवक वाढल्याने त्याचा परिणाम खानदेशात केळी दरांवर सतत होत आहे.

Banana Rate
Banana Rate : केळीच्या दरात काहीशी सुधारणा

खानदेशात १५ ते १६ दिवसांपूर्वी दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीचा दर कमाल ३३६१ रुपये प्रतिक्विंटल होता. परंतु सध्या निर्यातक्षम केळीचा दर २३०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल, असा शिवार खरेदीत आहे. तर कमी दर्जाच्या केळीचे दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. गणेशोत्सव काळात राज्यातही केळीस मोठा उठाव होता.

Banana Rate
Banana Disease : केळीमधील करपा, सीएमव्ही रोगांचे नियंत्रण

यामुळे नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागांतही केळीची पाठवणूक बऱ्यापैकी होती. खानदेशात सध्या रोज ७० ते ८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. अनेक भागांत कांदेबाग केळीची काढणी ७० ते ८० टक्के पूर्ण झाली आहे. पुढील आठवड्यात आवक कमी होईल, अशी स्थिती आहे.

दर्जेदार केळी जळगावातील चोपडा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, यावल आदी भागांत आहेत. रावेर, मुक्ताईनगरात केळीची आवक फारशी नाही. पुढे खानदेशात केळी आवक आणखी कमी होईल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com