Fertilizer Manufacturing Companies agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Manufacturing Companies : खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग केल्यास कारवाई करणार; मंत्री आबिटकरांच्या सूचना

Prakash Abitkar : खतांचे लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाने निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. अशा सूचना सार्वजनीक मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

sandeep Shirguppe

Kolhapur Agriculture Department : शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाने निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. अशा सूचना सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे (ता.०६) मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्या आणि निविष्ठा विक्रेत्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग न करता आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल, असे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल याचीही खबरदारी घ्यावी. गुणवत्तापूर्ण खतांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांच्या तपासण्या कराव्यात. निविष्ठा केंद्रांमध्ये दर्जेदार खते, बी बियाणे व कीटकनाशके विक्रीसाठी उपलब्ध होतील, तसेच निविष्ठाबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावी. अशा सूचना आबिटकर यांनी दिल्या.

कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी चालू हंगामाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध सर्व खतांची माहिती दिली. जिल्ह्यात कोणत्याही खतांचा तुटवडा नसल्याचे पांगरे यांनी सांगितले. तसेच सद्यस्थितीत जिल्ह्यात ४६ हजार ७५७ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यामध्ये १६ हजार १४३ मेट्रिक टन युरिया आहे, असे सांगितले. यापुढेही सर्व खतांचा गुणवत्तापूर्ण व मुबलक पुरवठा होईल याचे नियोजन कृषी विभागाने केल्याचे कृषी अधिकार पांगरे यांनी सांगितले.

कार्यक्रम नको ;कार्यवाही करा

निविष्ठा विक्रेत्यांच्या बैठकीनंतर मंत्री अबिटकर यांनी आत्मा व स्मार्ट विभागातील योजनांचा आढावा घेतला. यावेळी आबिटकर म्हणाले, "कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकरी व शेतीशी नाळ जोडून काम करावे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम प्राधान्याने राबवावेत. तसेच शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. जिल्ह्यात रेशीम शेती व बांबू उत्पादन, मध उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे, याचा विचार करुन रेशीम व बांबू शेती, मध उत्पादन व विक्रीला चालना देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करा. हे करत असताना कार्यक्रम घेण्याऐवजी त्या त्या योजनांची, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा", अशा सूचना आबिटकर यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी प्रणाली चव्हाण, करवीर चे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, किरण पाटील, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT