MLA Prakash Abitkar : 'कोल्हापुरात कृषी अवजारे यंत्रे परीक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न'

Agricultural Implements : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय आयोजित कृषी यांत्रिकीकरण दिवस व आधुनिक कृषी यंत्रे व अवजारे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
MLA Prakash Abitkar
MLA Prakash Abitkaragrowon
Published on
Updated on

Modern Agricultural Machinery Kolhapur : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय आयोजित कृषी यांत्रिकीकरण दिवस व आधुनिक कृषी यंत्रे व अवजारे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष, आमदार प्रकाश आबिटकर यांनी यांत्रिकीकरणाची गती वाढविण्यासाठी कोल्हापुरात कृषी अवजारे यंत्रे परीक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केले. तसेच कृषी विद्यापिठातील माती परिक्षण केंद्रामध्ये विविध सुधारणा करण्याबाबतही आमदार आबिटकर यांनी मार्गदर्शन केले.

आमदार आबिटकर म्हणाले, "मजुरांची अनुपलब्धता, कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमती व घटणारे उत्पादन यांचा विचार करता आधुनिक शेती औजारांचा व यंत्रांचा वापर पीक लागवड खर्चात बचत आणि उत्पादन वाढीसाठी गरजेचा आहे. 'महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, "कृषी क्षेत्रासाठी आवश्यक कृषी यंत्रे व अवजारांचे अनेक उत्पादक जिल्ह्यात आहेत. कोल्हापूरला कृषी यंत्रे अवजारे परीक्षण केंद्र उभे राहिले तर कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक विकासाला चालना मिळेल."

कृषी विभागाचे सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी जिल्हा यांत्रिकीकरण योजनांच्या अंमलबजावणीत आघाडीवर असून गटशेती आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या मोठ्या संयंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, भरत पाटील, संघटनेचे सचिव संजय जाधव, डॉ. शैलेंद्र कांबळे.

पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजीराव पाचपुते, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. संग्राम धुमाळ, विस्तारशिक्षण विभागप्रमुख डॉ. भारत कोलगणे, कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहन जाधव, कृषी विद्या विभागप्रमुख डॉ. रेणुका शिंदे, वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख सुनीता वाघमारे उपस्थित होते. डॉ. मनीषा मोटे यांनी सूत्रसंचालन केले.

MLA Prakash Abitkar
Tigers in kolhapur forest : कोल्हापूरच्या जंगलात लवकरच दिसणार आता चंद्रपूरचे वाघ!

ऊस रोपलावण मशीन, सोलर कोळपे

प्रदर्शनात शेतकऱ्याचे काम सुलभ होईल अशी यंत्रे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यामध्ये सोलरवर चालणारे कोळपे आणि ऊस रोपलागवड मशीन आकर्षण ठरले.

विविध विषयांवर मार्गदर्शन

डॉ. सचिन नलावडे यांनी शेतीमधील ड्रोनचा वापर, डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी काळानुरूप ऊसशेती तंत्रातील बदल, डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी ऊस, फळबाग व भातशेतीचे यांत्रिकीकरण आणि तामिळनाडू राज्याच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता डॉ. आर. मुरुगेसन यांनी कृषी यांत्रिकीकरण विषयावर मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com