Takari Irrigation  Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Scheme : ताकारीच्या पाण्याने तासगावला दिलासा; ऐन उन्हाळ्यात मिळाले शेतीला पाणी

Agriculture Irrigation : ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील कडेगाव व खानापूर तालुक्यातील गावांची तहान भागवून या पाण्याने तासगाव तालुक्यात पोहोचले आहे.

Team Agrowon

Sangli News : ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील कडेगाव व खानापूर तालुक्यातील गावांची तहान भागवून या पाण्याने तासगाव तालुक्यात पोहोचले आहे. हे पाणी आळते (ता. तासगांव) गावाजवळून वाहत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुढे सरकण्यासाठी योजनेचे ११ पंप सुरू केले आहेत. त्यामुळे या आवर्तनामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महिनाभरापासून वाढलेल्या उन्हाळ्यामुळे लाभक्षेत्रातील पिकांची तहान वाढली तसेच शिवारातील संपूर्ण ऊस तुटून गेल्यामुळे त्या प्रचंड क्षेत्रास पाणी देणे अत्यावश्यक झाले. यासाठी जमिनीतील पाणी उपसा वाढला. व पाणीपातळी भरभर खालावली. म्हणून ताकारी योजनेचे पाणी लवकर सुरू करावे अशी मागणी लाभक्षेत्रातून जोर धरत होती.

यास अनुसरून ताकारी योजना ८ मार्चपासून सुरू करण्यात आली. सोडण्यात आलेले पाणी कालव्याच्या. शेवटपर्यंत आणि सर्व शेतकऱ्यांना भरपूर मिळाल्याशिवाय बंद होणार नाही, अशी माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

योजनेचे पहिले आवर्तन १८ डिसेंबर ते १० फेब्रुवारी अखेर ५५ दिवस चालू होते. जमिनीत मुरलेल्या पाण्याचा उपयोग बारमाही पिकांसह, भाजीपाला, फळे आणि नगदी पिकांना झाला. त्यातच आता सगळीकडे ऊस तूटुन गेल्याने खोडव्यास पाणी द्यावे लागत आहे.

कडाक्याचा उन्हाळा आणि प्रचंड पाणीवापर यामुळे ताकारीचे पाणी भरभर पुढे सरकत नाही. यासाठी एकूण ११ पंप सुरू केले आहेत. यापैकी टप्पा ३ वरील ३ पंप आणि टप्पा ४ वर २ पंप सुरू करुन सोनहिरा खोऱ्यासह तडसर परिसरात सोडले आहे. योजना कितीही दिवस सुरू ठेवावी लागली तरी पाणी शेवटच्या १४४ कि.मी.वर पोहचविल्याशिवाय बंद होणार नाही
- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT