Turmeric Farming in India:‘आयआयएसआर’ प्रगती कोझीकोड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च या संस्थेने विकसित केलेला कमी कालावधीचा (१८० ते २०० दिवस) हा वाण उच्च उत्पादनक्षम आहे. याची हळकुंडे गडद पिवळसर जाड व ठसठशीत असतात. वाळलेल्या हळदीचा उतारा १८ टक्के आहे. संशोधन केंद्रातील मागील दोन वर्षांतील निरीक्षणातून मातृकंदाचे प्रमाण तुलनेने कमी असून, हळकुंडे अधिक मिळत असल्याचे आढळले आहे. या वाणात कुरकुमीनचे प्रमाण ५.०२ टक्के आहे. ओल्या हळदीचे सरासरी हेक्टरी उत्पादन ३८ मे. टन असून, अनुकूल वातावरणात हेक्टरी उत्पादन ५२ मे. टनांपर्यंत मिळाले आहे..आयआयएसआर प्रतिभाहा वाण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च, कोझिकोड या संस्थेद्वारे विकसित कमी कालावधीचा (२२५ दिवस) व उच्च उत्पादनक्षम वाण आहे. हळकुंडे लालसर तपकिरी आणि ठळक असतात. गाभ्याचा रंग लालसर पिवळा असतो. हळदीची पावडर उत्कृष्ट रंगाचे, स्वादिष्ट चवीची मिळते. यात कुरकुमीनचे प्रमाण ६ ते ७ टक्के (सरासरी ६.२५ टक्के) तर सुगंधी तेल ६.२ टक्के आढळून येते. या गुणवैशिष्ट्यांमुळे या वाणाला औद्योगिक, औषधी उद्योग आणि स्वयंपाकासाठीही चांगली मागणी आहे. ओल्या हळदीचे उत्पादन ३९.१२ मे.टन प्रति हेक्टरी असून, वाळलेल्या हळदीचे प्रमाण १८.५० टक्के मिळते..आयआयएसआर सुदर्शनाइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च, कोझीकोड या संस्थेने १९७१ मध्ये विकसित केलेला हा वाण केरळ, आंध्र प्रदेशासाठी शिफारशीत आहे. या वाणाची हळकुंडे जाड ठसठशीत आणि घट्ट असतात. कमी कालावधीच्या (१९० दिवस) वाणाच्या ओल्या हळदीचे सरासरी उत्पादन २८.८० मे.टन असून, अनुकूल हवामानात ५४.९० मे. टन प्रति हेक्टरी मिळते. कुरकुमीनचे प्रमाण ५.३० टक्के, तर सुगंधी तेलाचे प्रमाण ७ टक्के आढळून येते. कंदकुज, लीफ ब्लॉच या रोगास मध्यम प्रतिकारक आहे. ओल्या हळदीपासून वाळलेल्या हळदीचे प्रमाण २० टक्के मिळते..Turmeric Yellow Leaves: हळद पिकाची पाने पिवळी पडण्यामागील कारणे आणि उपाय.सुरंजनाआंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात व पश्चिम बंगाल येथे लागवडीखाली असलेल्या या वाणाचा कालावधी २३० ते २५० दिवसांचा आहे. ओल्या हळदीचे हेक्टरी ४६.४० मे. टन उत्पादन मिळते. कुरकुमीनचे प्रमाण ५.१० टक्के, सुगंधी तेलाचे प्रमाण ६.५३ टक्के, तर ओलीओरेझीनचे प्रमाण १२.२५ टक्के आढळते. संशोधन केंद्रातील पाहणीत हा आपल्याकडेही चांगले उत्पादन देत असल्याचे आढळले आहे..लाकाडोंगमेघालय राज्यातील हा हळद वाण वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे जगप्रसिद्ध आहे. मेघालयातील जैनताई हिल्स या जिल्ह्यातील जोवाई ब्लॉकमधील लाकाडोंग या गावासह मुकाईव, उमचलाईत, सहस्नियांग, लुकसी या परिसरातील काही गावात लागवडीखाली असलेल्या या हळदीला औषधी उद्योगात चांगली मागणी आहे. या वाणाचा कालावधी १९० ते २०० दिवसांचा असून, या हळदीपासून १५ ते २५ मे.टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. मेघालयातील थंड वातावरण या हळदीला चांगले मानवते. या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ७ ते १२ टक्के, सुगंधी तेलाचे प्रमाण ७.८ टक्के तर ओलीओरेसिनचे प्रमाण १४ टक्के मिळते. हळकुंडाचा गाभा गडद नारंगी पिवळ्या रंगाचा असतो. या हळदीला भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे. मराठवाड्यातील उष्ण वातावरणात हा वाण घेण्यासाठी उभ्या पिकात एरंडी किंवा तूर या पिकांची लागवड करून सावली केल्यास चांगली वाढ होत असल्याचे केंद्रावर प्रयोगात दिसले आहे. फळबागेतील मधल्या पट्ट्यातही या वाणाची लागवड करणे शक्य आहे..मेघा हळद १मेघालयातील स्थानिक लाकाडोंग या प्रसिद्ध हळदीपासून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संकुल अभियान मेघालय यांनी निवड पद्धतीने विकसित केलेला वाण ईशान्य डोंगराळ प्रदेशासाठी शिफारशीत आहे. अत्यंत उत्कृष्ट गुणवत्ता असलेला हा वाण पक्व होण्यासाठी ३०० ते ३६५ दिवसांचा कालावधी लागतो. या वाणाचे ओल्या हळदीचे हेक्टरी २७ ते ३२ मे. टन उत्पादन मिळते. यात कुरकुमीनचे प्रमाण ६.८ ते ८.३ टक्क्यांहून अधिक मिळते. ओल्या हळदीपासून वाळलेल्या हळदीचे प्रमाण साधारणपणे १६.४ ते १९.५ टक्के प्रमाण मिळते. पानावरील ठिपके आणि पानावरील डाग यासारख्या रोगांना हा वाण सहनशील आहे..सोनाकेरळ कृषी विद्यापीठाने विकसित केलेला मध्यम कालावधीचा (२४० ते २७० दिवस) वाण आहे. ओल्या हळदीचे उत्पादन हेक्टरी ३७.३४ मे. टन मिळते. वाणाचे कंद नारंगी पिवळ्या रंगाचे असतात. कुरकुमीनचे प्रमाण ७.११ टक्के, तर सुगंधी तेलाचे प्रमाण ७.११ टक्के आणि ओलीओरेसिनचे प्रमाण १८.० टक्के असते. हा वाण पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगास कमी प्रमाणात बळी पडतो..दुग्गीराला रेडआंध्र प्रदेशातील दुग्गीराला गावाच्या नावावरून ओळखला जाणारा स्थानिक वाण असून, त्याची आंध्र प्रदेशासह तेलंगणा, कर्नाटक राज्यात मोठी लागवड होते. यास परिपक्व होण्यासाठी २६० ते २७० दिवस लागतात. या वाणाचे कंद व गाभा गडद नारंगी असल्याने त्याला ‘रेड’ या उपनावानेही ओळखले जाते. कंद लांब, ठसठशीत आणि मजबूत असतात. या वाणापासून ६.७५ ते ७.० मे. टन प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. ओल्या हळदीपासून वाळलेल्या हळदीचे प्रमाण २३.५% मिळते. कुरकुमीनचे प्रमाण ४ ते ५.५ टक्के असते. हा वाण काळ्या कसदार जमिनीत चांगला येतो. पानावरील डाग (लिफ ब्लॉच) रोगासाठी सहनशील आहे..Best Turmeric Varieties: हळदीच्या वाणांची गुणवैशिष्ट्ये.मेदुकरआंध्र प्रदेशातील मायदुकर व आसपासच्या कडप्पा जिल्ह्यात व तेलंगण राज्यातील स्थानिक वाण आहे. परिपक्वतेसाठी २७० दिवस लागतात. या वाणाचे कंद लांब आणि ठसठशीत असतात. फिक्कट रंगाच्या हळदीची मागणी असलेल्या मसाला व पावडर उद्योगात या वाणाला विशेष पसंती दिली जाते. या वाणाची उत्पादन क्षमता (५ ते ६ मे. टन प्रति हेक्टर) चांगली असून कुरकुमीनचे प्रमाण मध्यम (२-३ %) आहे. संशोधन केंद्रावर याचे चांगले उत्पादन मिळाले आहे..एनडीएच ८कुमारगंज (जि. अयोध्या) येथील आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाद्वारे विकसित कमी कालावधीचा (२१० दिवस) हा वाण प्रामुख्याने सुगंधी तेल (८.२० टक्के) व ओलीओरेसीनचे (१३.२० टक्के) अधिक प्रमाणासाठी ओळखला जातो. यात कुरकुमीनचे प्रमाण ३.७ ते ५.५ टक्के पर्यंत आढळून येते. या वाणाला औषधी व प्रक्रिया उद्योगात चांगली मागणी असते. एनडीएच ८ या वाणाचे उत्पादन हेक्टरी ५ ते ६ टन मिळते..पीटीएस १०प्रामुख्याने तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात लागवडीखाली असलेल्या हळद वाणांना इरोड हळद असे भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. पीटीएस १० हा २४० दिवसांत तयार होणारा वाण असून, त्याचे हेक्टरी उत्पादन ३४ मे. टन मिळते. ओल्या हळदीपासून वाळलेल्या हळदीचे १९ टक्के प्रमाण मिळते. या वाणाचे कंद लांब, जाड आणि आकर्षक असतात. आतील गाभ्याचा रंग चमकदार पिवळा असतो. या वाणात कुरकुमीनचे प्रमाण ४ ते ५.५ टक्के असते..एनडीएच ९८कुमारगंज (जि. अयोध्या) येथील आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेला हा वाण २४० दिवसांत तयार होतो. ओल्या हळदीचे हेक्टरी सरासरी उत्पादन ३२.५८ मे. टन असून, अनुकूल हवामानात ५३.७६ मे.टन पर्यंत उत्पादन दिलेले आहे. ओल्या हळदीपासून वाळलेल्या हळदीचे प्रमाण २०.५९ टक्के मिळते. कुरकुमीनचे प्रमाण ५.० टक्के, सुगंधी तेलाचे प्रमाण ७.० टक्के तर ओलीओरेसीनचे प्रमाण १२.७७ टक्के असते. भारतातील विविध हवामानात हा वाण चांगले उत्पादन देतो. पानावरील ठिपके व पानावरील करपा या रोगाचा कमी प्रादुर्भाव होतो..सीआयएम पीतांबरलखनौ येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स (CIMAP) या संस्थेने विकसित केलेला हा वाण १८० ते १९० दिवसांत तयार होतो. ओल्या हळदीचे उत्पादन ५०० ते ६५० क्विंटल प्रति हेक्टरी असून, आपल्या संशोधन केंद्रावर या वाणाचे चांगले उत्पादन मिळाले आहे. या वाणात कुरकुमीनचे प्रमाण १२.५ टक्के असते. हा वाण पानावरील डाग (लिफ ब्लॉच) या रोगाला सहनशील आहे.- रमेश देशमुख ९४२३१५६५९३(मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत, जि. हिंगोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.