Satpuda Nature Safari Agrowon
ॲग्रो विशेष

Satpuda Nature Safari : सातपुड्याच्या जंगलात साकारतेय प्रति ‘ताडोबा’

Forest Department : सातपुड्यातीलल नैसर्गिक सौंदर्यासह जंगलची सफारी वनविभागाद्वारे सर्वसामान्य नागरिकांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुली करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : सातपुडा पर्वतातील वाघ, बिबटे, हरणासह सुकी धरण, मचाण, त्रिवेणी धबधबा, अवणी संरक्षणकुटी, माकडदरी, धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मात्र आता सर्वसामान्य पर्यटकांना ते सहसा पाहता येत नाही. मात्र आता सातपुड्यातीलल नैसर्गिक सौंदर्यासह जंगलची सफारी वनविभागाद्वारे सर्वसामान्य नागरिकांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुली करण्यात येणार आहे. ‘सातपुडा नेचर सफारी’ अंतर्गत ही सफारी होणार आहे.

सातपुड्यातील ५० ते ६० युवकांना याबाबत प्रशिक्षण दिले गेले असून, त्यांनाच पर्यटकांना या सफारीत ने-आण करण्यास सांगितले जाणार आहे. यामुळे या भागातील युवकांना रोजगाराच्या संधी होणार आहे. सकाळी व सायंकाळी सूर्योदय व सूर्यास्तासारखे क्षण या वेळी पाहता येतील. परदेशातील अनेक पक्षी या परिसरातील नदी, धबधब्यामध्ये स्थलांतर करून येतात. अंडी घालतात. नंतर काही काळाने परत निघून जातात. यामुळे पक्षिप्रेमींची या ठिकाणी गर्दी असते.

पाच कोटींचा प्रस्ताव

जंगल सफारीच्या मार्गावर रस्ते तयार करणे, पाणवठे तयार करणे, मचाण तयार करणे आदी सुविधा देण्यासाठी पाच कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यापैकी दीड कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, सुविधा उभारण्यास सुरवात झाली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलेल्या पाल (ता. रावेर) सातपुडा जंगल सफारीत अस्वल, ससा, मोर, रानडुक्कर, बिबट्याचे मार्क आढळले होते.

सातपुडा जंगल सफारीला गारबडीं रोपवाटिकेपासून सुरुवात होईल. पुढे सुकी धरण, मचाण, त्रिवेणी धबधबा, अवणी संरक्षणकुटी, माकडदरी धबधबा या परिसर पाहता येईल. २७ किलोमीटर अंतरात आतापर्यंत बिबट, अस्वल, मोर, रानडुक्कर, नीलगाय, सांबर, चिंकारा, हरिण, सर्पगरूड, अजगर, तडस, कोल्हा, लांडगा या प्राणी पाहता येतील.

...असा असेल प्रवास

पाल व सातपुडा पर्वतातील २७ किलोमीटरचा हा परिसर जंगल सफारीसाठी निश्‍चित केला आहे. वन विभागाचा कंपार्टमंट क्रमांक २४-२५ यासाठी आहे. हा परिसर फिरण्यासाठी अडीच ते तास लागतील. गारबडीं रोपवाटिकेपासून सुरुवात होईल. सफारीसाठी सहा सीटर वाहनाची व्यवस्था वन व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात येईल. पर्यटकांना सोबत गाइड दिला जाईल.

वाहनांचा एक ट्रीपचा खर्च (सहा जणांचा) अडीच हजार ते तीन हजार असेल. या उत्पन्नातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. जो निधी शिल्लक राहील तो पाल गावाच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण नियमांमुळे अनेकदा जंगल सफर करणे शक्य होत नाही. पण आता हो सुविधा वन विभाग पाल (ता. रावेर) येथे सुरू करणार आहे. त्यातून स्थानिकांना रोजगारदेखील मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat GR: अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटी रुपयांचे वाटप होणार; शासन निर्णय आला  

Agrowon Diwali Ank : पेरणी उमेदीची

Agricultural Credit: शेती कर्ज वितरण वाढवा, FPO च्या सोयीनुसार योजना आखा, अर्थमंत्री सीतारामन यांचे ग्रामीण बँकांना निर्देश

Turmeric Farming: हळदीवरील खोडकिडा,पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण

Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी अन् दिवाळी

SCROLL FOR NEXT