Forest Conservation : जंगलांचे संवर्धन गरजेचे...

Importance of Forest : पृथ्वीवर पूर्वी घनदाट जंगल होते. ते आता विरळ होत चालले आहे. जंगलाचे कमी होत चाललेले प्रमाण व वृक्षतोड हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
Forest Conservation
Forest ConservationAgrowon

Forest Conservation Necessary : पृथ्वीवर पूर्वी घनदाट जंगल होते. ते आता विरळ होत चालले आहे. जंगलाचे कमी होत चाललेले प्रमाण व वृक्षतोड हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पृथ्वीच्या एकूण भूभागांपैकी ३३ टक्के भूभागावर जंगलक्षेत्र असायला हवे. सध्या जगभरात ३१ टक्के क्षेत्रावर विरळ जंगलक्षेत्र आहे.

तर भारतात २४ टक्के आणि महाराष्ट्रात १७ टक्के जंगलक्षेत्र आहे. जगभराचा विचार केल्यास, दरवर्षी सुमारे एक कोटी हेक्टरवर क्षेत्रावरील जंगलतोड सुरूच आहे. वाढत्या जंगलतोडीमुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत आहेच. शिवाय मॉन्सूनच्या पावसावर देखील परिणाम झाल्याचे दिसून येते. त्याचा एकूण परिणाम शेतीक्षेत्रावर होत आहे.

हरितगृह वायूंच्या प्रमाणात वाढ

दिवसेंदिवस शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापरामध्ये वाढ होत आहे. अमोनिअम सल्फेट व युरियाच्या वापराने हवेत नायट्रस ऑक्साइडचे प्रमाण वाढले. हवेतील नायट्रस ऑक्साइड शोषून घेण्यामुळे हवेचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी जगात सहा कोटी टन युरिया खताचा वापर होतो.

याशिवाय जनावरांचे रवंथ करण्याच्या प्रक्रियेमधून मिथेन वायूची निर्मिती होते. कोळशाच्या खाणी, तेल विहिरी वातानुकूलित यंत्रे यातून हरितगृह वायूंची भर पडते. ते हवेच्या तापमान वाढीस कारणीभूत आहे.

Forest Conservation
Forest Conservation : मियावॉकी, गवत लागवडीतून वनसंवर्धनाचे प्रयत्न

हवा प्रदूषणात वाढ

धुळीची वादळे, तसेच भात, ऊस, गहू या पिकांसह इतर पिके काढणीनंतर त्यांची शेतात उरलेली धस्कटे जाळली जातात. वाहनांसाठी वापरले जाणारे डिझेल व पेट्रोलच्या ज्वलनाने देखील वायू प्रदूषणात भर पडते. कारखान्यांच्या चिमण्यांमधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत सोडले जातात. असे सर्व घटक हवा प्रदूषण आणि हरितगृह वायूचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत आहेत.

नैसर्गिक आपत्तीत वाढ

अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर, अवेळी व अवकाळी पाऊस, गारपीट, भूस्खलन, चक्रीय वादळांच्या संख्येत वाढ व वारंवार दुष्काळी परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अंटार्क्टिकामधील बर्फ वितळून समुद्रांच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीमुळे किनाऱ्यावरील मानवी वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे.

२००५ मध्ये मुंबई, २०१३ मध्ये केदारनाथ उत्तराखंड, २०१४ मध्ये माळीण, २०१९ व २०२० मध्ये केरळ, सन २०२३ मध्ये तामिळनाडू येथे अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी झाली.

Forest Conservation
Forest Conservation : वन विभागाकडून १२० कुटुंबांना गॅस जोडणी

दुष्काळी स्थितीमध्ये वाढ

हवामान बदलाने मॉन्सूनच्या आगमनावर व वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. मागील काही वर्षात जसे की १९७२, १९८६, २००३, २००८, २०१२, २०१५, २०१८ या वर्षात भीषण दुष्काळी स्थिती महाराष्ट्राने अनुभवली. या काळात गावागावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करणे तसेच जनावरांसाठी छावण्या उभाराव्या लागल्या. खेड्यातील लोकांचे शहरी भागांत स्थलांतर वाढले.

हे करायला हवे...

हरितगृह वायूचे प्रमाण कमी करणे

वृक्षसंवर्धन व नवीन वृक्षलागवडीवर भर देणे.

कार्बन क्रेडिट योजना राबवणे

सौरऊर्जेचा वापर वाढवणे व उत्पादन करणे

पवनचक्क्यांची वाढवून त्याद्वारे वीजनिर्मितीवर भर द्यावा.

जलविद्युत, हरितऊर्जा, इथेनॉलचा वापर वाढवणे

इलेक्ट्रिक कार, बस, ट्रक इत्यादी वाहननिर्मिती भर देऊन त्यांचा वापर वाढविणे.

संरक्षित शेतीक्षेत्र वाढवणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com