Animal care Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Care : जनावरातील रिंगणी व्याधीची लक्षणे आणि उपाय

Ringani Disorder : जनावरांमध्ये रिंगणी व्याधी झाल्यास जनावर विकून न टाकता त्यावर वेळीच शस्त्रक्रिया करून उपचार केल्यास जनावरे पहिल्यासारखे कामासाठी वापरता येतात.

Team Agrowon

Animal Diseases : गायी व म्हशीमध्ये बरेचसे आजार किंवा व्याधी या शल्कचिकित्सा संबंधित म्हणजेच ऑपरेशन करुन बऱ्या करता येतील अशा आहेत. जसे की, शिंगाचा कर्करोग, डोळ्यांचा कर्करोग, खांद्यावरील ट्युमर, अस्थिभंग, जखमा या व्याधीपैकीच एक म्हणजे रिंगणी.

जनावरांमध्ये रिंगणी व्याधी झाल्यास जनावर विकून न टाकता त्यावर वेळीच शस्त्रक्रिया करून उपचार केल्यास जनावरे पहिल्यासारखे कामासाठी वापरता येतात. रिंगणी व्याधीची लक्षणे आणि या व्याधीवर उपचार काय करायचे? याचीच माहिती आपण घेणार आहोत.

रिंगणी ही व्याधी जनावरांना हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. रिंगणी व्याधीला शास्त्रीय भाषेत अपवर्ड फिक्सेशन ऑफ पटेला किंवा स्ट्रींग हॉल्ट अस म्हणतात. रिंगणी हे स्थानिक भाषेतील नाव आहे. जनावरांना रिंगणी व्याधीचा त्रास प्रामुख्याने हिवाळ्यात होतो. या रिंगणीसाठी पटेला नावाची अस्थी कारणीभूत असते.

जनावराच्या मागच्या पायाच्या आतील बाजूस तीन प्रकारच्या पटेला असतात. त्यातील मेडिअल पटेला अस्थी ताठर झाल्यास रिंगणी होते. पटेला अस्थी लहान वासरांमध्ये आकाराने खूप लहान असते. वयानुसार ती अस्थी हळूहळू वाढत जाते. या अस्थीला एक विशिष्ट आकार मिळाल्यानंतर त्याची वाढ थांबते. पटेला अस्थी ताठर झाल्यामुळे जनावराला हालचाल करताना त्रास होतो, त्यामुळे जानावर लंगडत चालते.

रिंगणी व्याधीची लक्षणे

रिंगणीमुळे मागचा एक किंवा दोन्ही पाय बाधीत होतात. मागच्या पायाची सांध्याची हालचाल व्यवस्थित होत नाही. जनावर विश्रांतीनंतर विशेषतः सकाळी लंगडत, पण काही अंतर चालल्यानंतर चाल ही व्यवस्थित होते.

पाय ताठर झाल्यामुळे कधी कधी जनावरांचे खुर जमिनीवर घासतात व त्यामुळे काही जनावरात रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो. बाधित जनावरे जमिनीवर पाय घासतात. जनावरे पायांची हालचाल झटके मारत करतात. अशा जनावरांत चारा खाणे, पाणी पिणे व्यवस्थित असते.

रिंगणीवर उपचार काय आहेत?

अशा जनावरांची वेळीच पशुवैद्यकीय डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करावी. अगदी काही वेळातच ही शस्त्रक्रिया होते. त्यानंतर जनावर व्यवस्थित चालू शकतं आणि त्याला सांध्याची हालचाल करता येते. या शस्त्रक्रियेमध्ये मागच्या पायाच्या आतील बाजूस भूल दिली जाते आणि मेडिअल पटेला अस्थी तोडली जाते.

शस्त्रक्रियेमुळे दुधाळ किंवा गाभण जनावर आणि काम करणाऱ्या बैलांत कोणताही विपरित परिणाम होत नाही. शस्त्रक्रियेनंतर जनावरास लगेच चालवले जाते. अशाप्रकारे या रिंगणी व्याधीची लक्षणे ओळखून वेळेवर उपचार केल्यास रिंगणी व्याधी बरी होते.

--------------

स्त्रोत - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT