Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : मराठवाड्याच्या पाण्यासाठी १३ ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषण

Water Crisis In Marathwada : मराठवाड्यातील वर्षानुवर्ष रखडलेला सिंचन अनुशेष कळीचा मुद्दा आहे. पाण्याअभावी शेतीचे हाल आहेत. नापिकी, कर्जबाजारी, बेरोजगारी, स्थलांतर, शेतकरी आत्महत्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्‍नावर मराठवाडा पाणी परिषदेने आक्रमक भूमिका घेतली होती. आता घोषणांच्या पावसात जनतेला भिजविणाऱ्या सरकारचे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याकडे लक्ष वेधण्यासाठी १३ ऑक्टोबरला विभागीय आयुक्तालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे. ‘आता नाही तर कधीच नाही, मी पण येतोय तुम्हीपण या’ असे म्हणत जनतेत जागृतीसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

मराठवाड्यातील वर्षानुवर्ष रखडलेला सिंचन अनुशेष कळीचा मुद्दा आहे. पाण्याअभावी शेतीचे हाल आहेत. नापिकी, कर्जबाजारी, बेरोजगारी, स्थलांतर, शेतकरी आत्महत्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सिंचन प्रकल्प पाणी वितरण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. लोकप्रतिनिधींचे सिंचनविषयक प्रकल्पाकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

किमान मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षात तरी शासनाने सिंचन अनुशेष निवारणाचा कालबद्ध कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंचनविषयक प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली जुने-नवे आकडे एकत्रित करून फक्त आकडे वाढवून सांगण्यात आले. यामुळे एका अर्थाने मराठवाड्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाल्याचा आरोप मराठवाडा पाणी परिषदेने केला आहे.

सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मराठवाड्यातील पाणी क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, व्यक्ती, संस्था यांच्यासोबत मराठवाड्यातला सिंचनविषयक अनुशेष निवारणाच्या कृती कार्यक्रमाबाबत चर्चा करायला हवी होती, तसेही झाले नाही. एकूणच मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासन, शासन मराठवाड्यातील पाणीप्रश्‍न गांभीर्याने घेत नसल्याचे पाणी परिषदेने स्पष्ट केले आहे.

...या आहेत अपेक्षा

- सिंचन अनुशेष निवारणाकरिता कालबद्ध कृती कार्यक्रम हवा.

- जलसंधारणाचे अपूर्ण असलेले प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याकरिता कृती कार्यक्रम हवा.

- मिशन मोडवर एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्याची आवश्यकता.

- सिंचन प्रकल्पाचे कालवे, वितरिका चाऱ्या याची त्वरित दुरुस्ती.

- पाणी वापर संस्था स्थापन करून, या संस्थांचे सक्षमीकरण करा.

- जलसंधारण आयुक्तालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT