Marathwada Water Issue : पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी दबाव गट बनविण्याची गरज

Water Crisis : अनुशेष शब्द फार मोठा आहे. पाणी आणि सिंचनाचा अनुशेष बाकी आहे. पाणी हे विकासाचे मूळ आहे. त्याशिवाय विकास अशक्य आहे.
Water Issue
Water Issue Agrowon

Chhatrapti Sambhajinagar News : ‘‘अनुशेष शब्द फार मोठा आहे. पाणी आणि सिंचनाचा अनुशेष बाकी आहे. पाणी हे विकासाचे मूळ आहे. त्याशिवाय विकास अशक्य आहे. पाणी प्रश्न व त्याचे महत्त्व समजविण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होईल.

त्यातून आणि प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी दबाव गट निर्माण करण्यात यश येईल आणि प्रश्न सुटेल, अशी आशा आहे,’’ असा विश्‍वास जलतज्ज्ञ आणि मराठवाडा विकास महामंडळाचे सदस्य डॉ. शंकरराव नागरे यांनी व्यक्त केला.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त मराठवाडा पाणी परिषद व ग्रामविकास संस्थेतर्फे देवगिरी सभागृह येथे रविवारी (ता. १०) ‘मराठवाडा सिंचन अनुशेष व भावी दिशा’ या विषयावर रविवारी (ता. १०) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे होते.

Water Issue
Water Crisis : माजलगाव धरणाची पाणीपातळी साडेबारा टक्क्यांवर

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे उपस्थित होते. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता अरुण घाटे, सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक अभियंता जयसिंग हिरे, गटशेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्‍नासंबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Water Issue
Water Crisis : पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्या

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त मराठवाडा पाणी परिषद व ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रामविकास भवन, देवगिरी सभागृह येथे रविवारी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही भरून निघणार नाही, एवढे मोठे नुकसान झाले आहे. किमान मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त तरी मराठवाड्याचा सिंचन अनुशेष दूर व्हावा व दुष्काळमुक्त मराठवाड्याच्या लोकचळवळीसाठी अनुकूल जनमानस व दबावगट निर्माण व्हावा, हा या कार्यशाळेचा हेतू होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com