Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यात केवळ अठरा टक्के सिंचन क्षेत्र आहे. तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सीना-भीमा नदीवर नवीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सीना-भीमा जोडकालवा निर्माण करण्यावर भर देत आहोत.
वडापूर बंधाराही वर्षाच्या आत पूर्ण करणार आहोत. या सर्व कामाच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू, अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
वडकबाळ येथे आमदार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून सहा कोटी खर्चातून येथील सीना नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मंजूर करण्यात आला आहे.
त्याचे भूमिपूजन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी रामप्पा चिवडशेट्टी, डॉ. चनगोंडा हविनाळे, अप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, हनुमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, संदीप टेळे, संगप्पा केरके, अधिकारी संजय कदम, घोडके, वडकबाळचे उपसरपंच राहुल पुजारी, अप्पासाहेब मोटे आदी उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले, की वडकबाळ येथील नदीकाठी घाट तयार केला आहे, येथे पर्यटन स्थळ निर्माण करण्यात येईल. वडकबाळ बंधारा एका वर्षात पूर्ण करणार आहोत.
या बंधारामुळे वडकबळ येथे ७५ हेक्टर, वांगी ८५ हेक्टर, हत्तूर येथे १९० हेक्टर, समशापूर येथील ४९ हेक्टर असे २९९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या भागाचे चित्र बदलणार आहे. आजूबाजूच्या कूपनलिकांनाही पाण्याचा स्रोत वाढणार आहे. येणाऱ्या काळामध्ये बंदलगी येथे नवीन बंधारा आपण मंजूर करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.