Swabhimani Shetkari Sanghatna Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : स्वाभिमानीने रोखली ऊस वाहतूक ; नगरमध्ये ऊस दर आंदोलन तीव्र

Swapnil Shinde

Ahmednagar Latest News : कोल्हापूरात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असताना नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात स्वाभिमानीने आंदोलन तीव्र केले आहे. कार्यकर्त्यांनी शेवगाव-पैठण रोडवरील गंगामाई साखर कारखान्यावर ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत साखर कारखानदार ऊसदर जाहीर करत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे उसाची वाहतूक होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानीने घेतली आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गंगामाई कारखान्यासह लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, मुळा सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, प्रवरा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांची ऊस वाहतूक अडवली.

ऊस दर आंदोलनात जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब फटांगडे, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, संदीप मोटकर, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गर्जे, औरंगाबादचे जिल्हा अध्यक्ष माऊली मुळे, रमेश कचरे, दादा पाचरणे, दादा टाकळकर, रामेश्वर शेळके, विकास साबळे, नाना कातकडे, रामेश्वर शेळके, शिवाजी साबळे, शेवगाव तालुका युवक चे अमोल देवढे, संकेत कचरे, नाना कातकडे, घोटण खानापूर, एरंडगाव, बाभूळगाव, करेटाकळी, गदेवाडी तसेच घोटण पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थि होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT