Sugarcane Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Organizations Protest : ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’, ‘आंदोलन अंकुश’ आक्रमक

Sugarcane Price Demand : ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

कर्नाटकातून येणारी ऊस वाहतुकीची वाहने अडवून चाकातील हवा सोडण्यात येत असल्याने विविध मार्गावर उसाने भरलेले वाहने थांबून राहिली. त्यामुळे शिरोळ दरम्यानच्या सलगर-सदलगा राज्य मार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या रांगा लागल्या होत्या.

स्वाभिमानी व आंदोलन अंकुशने पहिली उचल ३७०० रुपये व २०२३-२४ मधील गळीत हंगामासाठी २०० रुपये अंतिम हप्त्याची मागणी केली आहे. तोडगा निघत नाही तोपर्यंत ऊसतोड आणि वाहतूक करू नये. अन्यथा ती बंद पाडू, असा इशारा दिला.

गुरुवारी (ता. २८) कागवाड येथून गणेशवाडी मार्गे कर्नाटक राज्यातून ट्रॅक्टर ऊस भरून गाळपासाठी कारखान्याकडे जात असल्याची माहिती संघटनांना मिळताच औरवाड फाट्यावर उसाचे ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या चाकाची हवा सोडून वाहतूक रोखून धरली. तसेच शिरोळ तालुक्यात काही ठिकाणी सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT