Carbon Credit  Agrowon
ॲग्रो विशेष

Carbon Credit : ‘कार्बन क्रेडिट’च्य माध्यमातून उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवावा

Sustainable Agriculture : जमिनीतील कार्बनचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कार्बनचे उत्सर्जन रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

Team Agrowon

Sangli News : जमिनीतील कार्बनचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कार्बनचे उत्सर्जन रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातूनच ‘कार्बन क्रेडिट’ही संकल्पना पुढे आली आहे. आपल्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ‘कार्बन क्रेडिट’ उपक्रमात सहभागी होऊन उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवावा, असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले.

येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आरआयटी) येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व ग्रो इंडिगो प्रा. लि., मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने ‘ऊस शेतीसाठी कार्बन क्रेडिट’ या शिबिरात प्रतिक पाटील बोलत होते.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी जे. एस. पाटील, तालुका कृषी अधिकारी इंद्रजीत चव्हाण, ग्रो इंडिगो प्रा. लि.चे उज्ज्वल पाटील, अण्णा पऱ्हे, मिनल इनामके यांच्यासह संचालक उपस्थित होते.

प्रतिक पाटील म्हणाले, की ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीनंतर शेतातील पाचट न जाळता त्याचे शेतातच अच्छादन करावे, ठिबक सिंचनद्वारे पाणी व खताचे व्यवस्थापन करून कमीत-कमी मशागत करावी. यामुळे कार्बनचे कमीत-कमी उत्सर्जन होऊन पर्यावरणाचा समतोल राहू शकतो.

याचे सॅटेलाइटद्वारे मोज-माप करून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला जाऊ शकतो. जागतिक पातळीवर तसेच औद्योगिक क्षेत्रात काम सुरू आहे. गाताडवाडी व बोरगाव येथील पाणी पुरवठा योजनांच्या कार्यक्षेत्रात सामुदायिक सच्छिद्र पाइप निचरा प्रणाली राबवित आहोत.

ग्रो इंडिगो कंपनीचे तांत्रिक मार्गदर्शक उज्ज्वल पाटील म्हणाले, की या उपक्रमात सहभागी शेतकऱ्यांची मोबाइल ॲपद्वारे नोंदणी केली जाणार आहे. डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.ऊस विकास अधिकारी सुजय कुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT