
Solapur News : लोकमंगल साखर उद्योगाच्या माध्यमातून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना थेट कार्बन क्रेडिटचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना हा लाभ मिळवून देण्यात लोकमंगल समूहाने पुढाकार घेतला आहे. कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये थेट काही रक्कम मिळणार आहे, अशी माहिती लोकमंगल साखर कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी दिली.
आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल समूहाच्या बीबीदारफळ येथील लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, पराग पाटील,
सरव्यवस्थापक अशोक शिंदे, सरव्यवस्थापक सुनील घालमे, मुख्य शेतकरी अधिकारी ज्ञानदेव मारकड व इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी देशमुख म्हणाले, की गतवर्षी लोकमंगल कारखान्याने ‘एफआरपी’पेक्षा जास्त दर उसाला दिला आहे. ऊस बिले देताना अडचणी आल्यानंतरही शेतकऱ्यांनी समूहाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी या वेळी शेतकऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, की लोकमंगल समूहाच्या वतीने युरोपमधील एका उद्योगासमवेतचा कार्बन क्रेडिटबाबत करार अंतिम टप्प्यात आला असून, येणाऱ्या काळात कार्बन क्रेडिट या प्रणालीचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या कराराच्या माध्यमातून काही रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा उपक्रम राबवण्यात लोकमंगल जिल्ह्यात किंबहुना राज्यातही अग्रभागी असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. त्याचबरोबर यावर्षी लोकमंगलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.