Farmer Felicitation  Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Farming : शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे

Organic Farming : शेतकऱ्यांनी पारंपरिक सेंद्रिय शेती जपली पाहिजेच, पण आता बदलत्या काळानुसार नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून शेती करत शाश्वत शेतीकडे वळावे.

Team Agrowon

Ahilyanagar News : शेतकऱ्यांनी पारंपरिक सेंद्रिय शेती जपली पाहिजेच, पण आता बदलत्या काळानुसार नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून शेती करत शाश्वत शेतीकडे वळावे. पिकांची विविधता जोपासावी. शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतीला मोठी मदत होते. त्यामुळे नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी शेतीबाबत बहुआयामी असणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर येथे जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी (ता. १) वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांची उपस्थित होती.

डॉ. पंकज आशिया म्हणाले, की शेतकरी विकासासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे नवीन संशोधन करून नवे वाण विकसित करतात. नवे तंत्रज्ञान, नवे वाण आणि अनेक नव्या बाबी शेतीला विकासाकडे नेत आहेत.

परंतु नव्या काळाच्या बदलानुसार तंत्रज्ञान वापरातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रारंभी सुधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) विकास काळे, मोहीम अधिकारी नीलेश अभंग, जिल्हा कृषी अधिकारी (विघयो) सोनाली हजारे, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, शांतीलाल ढोबाळ, देवानंद गाडेकर, सचिन जाधव, शीतल मैड, अनुराधा म्हसे यांच्यासह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रदीप लाटे यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांचा सन्मान

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, बायोगॅस, सोलरपंपच्या लाभातून शेती यशस्वी केलेल्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) येथील रमेश गंडाळ व कुमशेत (ता. अकोले) येथील तुकाराम अस्वले यांनी अनुभव सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Roll Revision Protest: ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबवा : डाॅ. अजित नवले

Tomato Farming Success Story: टोमॅटो शेतीतून प्रगती गाठलेले बोरीबेल

Drought Management: सरपंचांनो, गावाचा ताळेबंद मांडा..

Minimum Support Price: ‘कमी’भाव जाहीर

Drought Mitigation: दुष्काळ निवारणाला द्या नवा आयाम

SCROLL FOR NEXT