Sustainable Farming : ज्ञान, व्यासंग, तंत्रावर आधारित व्यावसायिक शेतीचा आदर्श

Progressive Farming : अठरा देशी गायींच्या पालनासह ८० ते ९० टक्के सेंद्रिय शेतीवर भर देऊन जमिनीला श्रीमंत केले. कौशल्यातून अवजारांची निर्मिती केली.
Progressive Farming
Progressive Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. मधल्या काळात दुष्काळामुळे द्राक्षपीक कमी झाले. परंतु सिंचनाची सोय होईल त्यानुसार शेतकरी ऊस, भाजीपाला यांच्याकडेही वळले. च तालुक्यातील हणमंतवडिये गावानेही दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत.

येथील साहेबराव मारुती मोरे यांनी वयाच्या पंचाहत्तरीतही प्रगतिशील व प्रयोगशील शेती टिकवून धरली आहे. त्यांचा शेतातील उत्साह, जिद्द आणि चिकाटी विशीतल्या तरुणालाही मागे टाकेल अशीच आहे. साहेबराव सांगतात की पूर्वी घरची परिस्थिती बेताचीच होती.

वाटणीला तीन एकर शेती आली. पैकी दीड एकरच बागायती होती. वडील आजारी असल्याने शेती कसण्यात अडचणी यायच्या. शिकण्याची इच्छा होती. वडिलांनी त्यासाठी प्रयत्नही केले. आई देखील शेतात कष्ट करू लागली. सन १९७५ मध्ये भूगोल विषयाची पदवी घेतली. मन शेतात रमलं होतं. त्यामुळं नोकरीपेक्षा शेतीची जबाबदारी स्वीकारली.

Progressive Farming
Agriculture Success Story : बिराजदार यांचा झाला देशपातळीवर सन्मान

ज्ञानातून शेतीचा विकास

साहेबराव सांगतात की येरळा नदीवरुन पाणी आणलं. दोन एकर शेती बागायती केली. सन १९८१-८२ च्या दरम्यान एक एकर द्राक्ष बाग लावली. सन १९८६, १९९६, २००३ या तीन वेळेस दुष्काळ पडला. कडेगाव, विटा येथून टॅंकरने पाणी आणून बाग जगवली. शेतीतील पैसा शेतीसाठीच वापरू लागलो. जमेल तशी शेती विकत घेऊ लागलो.

चार एकरांसाठी विहीर खोदली. अभ्यास, प्रयोग, दररोज नवीन काही शिकण्याची वृत्ती ठेवली. फिरलं तर चरलं या संकल्पनेवर विश्‍वास होता. सन १९९२ मध्ये मोहोळ (जि. सोलापूर) येथील दादासाहेब बोडके यांचे शेतीचे प्रयोग पाहण्यात आले. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत सुधारित शेती सुरू झाली. नाशिक, सातारा, सोलापूर, जालना, धुळ्यापर्यंत जाऊन ज्ञान घेतले. जे करायचं ते मनापासून, आणि ते जिद्दीने तडीस न्यायचं ही वृत्ती ठेवली.

Progressive Farming
Agriculture Success Story : व्यावसायिक पीक पद्धतीद्वारे शाश्‍वतीची दिशा

जमिनीला केले श्रीमंत

विजापूर येथील श्री. चौंड्याळ आप्पा यांच्या ९० एकरांतील शेतीतील प्रयोग पाहून शेतीत सुधारणा केल्या. त्यातून गीर व खिलार अशा १८ देशी गायींचा गोठा उभारला. वर्षभरात सुमारे १२ ट्रॉली शेणखत व पुरेसे गोमूत्र उपलब्ध होते. त्यापासून जीवामृत स्लरी तयार केली जाते. सुमारे ८० ते ९० टक्के व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने होते. काही वेळा शेतात मेंढ्या बसविण्यात येतात. केवळ पीक उत्पादनवाढ हा उद्देश न ठेवता जमिनीला श्रीमंत करण्याकडे मोरे पितापुत्रांनी लक्ष दिले आहे. सन २०२४ मधील माती परिक्षणात जमिनीचा सेंद्रिय कर्ब ०.७० वरून २.७० टक्क्यांपर्यंत पोचल्याचे राहुल सांगतात.

तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण

द्राक्ष शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये शेतात हवामान केंद्राची उभारणी.

पिकाच्या मुळीच्या खोलीनुसार पाण्याची गरज लक्षात घेण्यासाठी जमिनीत दोन सेन्सर्स बसवले.

कडबा कुट्टी यंत्र व अन्य कमी खर्चातील सुटे भाग वापरून सुधारित पध्दतीचे ट्रॅक्टरचलित ग्रासकटर यंत्र केले विकसित.

ट्रॅक्टरला जोडून वापरण्यासाठीचे दोन नोझल्स असलेले तणनाशक फवारणी यंत्रही केले तयार.

ॲग्रोवनची साथ, शहाळ्याचा प्रयोग

मोरे पितापुत्र पहिल्या दिवसांपासून ॲग्रोवनचे वाचक आहेत. त्यातील द्राक्ष सल्ला, सेंद्रिय शेती, हवामान अंदाज, यशकथा, विविध पिकांचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आदी सर्व बाबींचा ते शेतात वापर करतात. कात्रणे काढून ती संग्रही ठेवली आहेत. ॲग्रोवनच्या माध्यमातूनच शहाळ्याच्या नारळाच्या सिंगापुरी, यलो ड्वार्फ आदी विविध वाणांची माहिती मिळाली. त्यातूनच त्याच्या लागवडीचा पर्याय पुढे आला. नारळशेती व वाणांविषयी सविस्तर धांडोळा घेत तीन वर्षापूर्वी आंध्रप्रदेशातून ग्रीन ड्वार्फ जातीच्या नारळाची रोपे आणून १८ बाय १८ फुटांवर २०० झाडांची लागवड केली आहे.

पुस्तकांचा व्यासंग

साहेबराव यांना पुस्तके वाचण्याचीही मोठी आवड आहे. त्यांच्या कपाटात इकिगाई भाग एक, दोन, तीन तसेच द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग यासह शेती व अन्य पुस्तके दिसून येतात. शेतीतील बारकावे डायरीत टिपून ठेवण्याची त्यांची पध्दत आहे.सातत्याने फिरत राहिल्याने त्यांनी मित्रपरिवारही जोडला. लोकांची पारख केल्याने त्यांच्या सानिध्यात आलेला माणूस कधीच दूर गेला नाही. त्यांच्या शेतातही लोकांचा सतत राबता असतो.

अशी केली प्रगती

ज्ञानाला कष्टाची व व्यावसायिक वृत्तीची जोड देत आज २२ एकरांपर्यंत शेतीचा विस्तार.

पाच विहीरी, दोन बोअर्स. सन २००४ ला ताकारीचं पाणी आलं. शेताजवळून ताकारीचा कालवाही आहे.

सुमारे १३ एकरांवर द्राक्षे, पाच एकरांपर्यंत ऊस.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चिरंजीव राहुल यांनी शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. -द्राक्षाच्या सुपर सोनाका आणि सोनाका तर उसाच्या को ८६०३२ आणि १०००१ या दोन जाती.

द्राक्षाचे एकरी १३ ते १५ टनांच्या आसपास तर सुरू उसाचे ७० ते ७५ टनांपर्यंत उत्पादन.

राहुल मोरे ९३०७६८१५५१' साहेबराव मोरे ९४०४२४२९३५

जमिनीला केले श्रीमंत

विजापूर येथील श्री. चौंड्याळ आप्पा यांच्या ९० एकरांतील शेतीतील प्रयोग पाहून शेतीत सुधारणा केल्या. त्यातून गीर व खिलार अशा १८ देशी गायींचा गोठा उभारला. वर्षभरात सुमारे १२ ट्रॉली शेणखत व पुरेसे गोमूत्र उपलब्ध होते. त्यापासून जीवामृत स्लरी तयार केली जाते. सुमारे ८० ते ९० टक्के व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने होते. काही वेळा शेतात मेंढ्या बसविण्यात येतात. केवळ पीक उत्पादनवाढ हा उद्देश न ठेवता जमिनीला श्रीमंत करण्याकडे मोरे पितापुत्रांनी लक्ष दिले आहे. सन २०२४ मधील माती परिक्षणात जमिनीचा सेंद्रिय कर्ब ०.७० वरून २.७० टक्क्यांपर्यंत पोचल्याचे राहुल सांगतात.

तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण

द्राक्ष शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये शेतात हवामान केंद्राची उभारणी.

पिकाच्या मुळीच्या खोलीनुसार पाण्याची गरज लक्षात घेण्यासाठी जमिनीत दोन सेन्सर्स बसवले.

कडबा कुट्टी यंत्र व अन्य कमी खर्चातील सुटे भाग वापरून सुधारित पध्दतीचे ट्रॅक्टरचलित ग्रासकटर यंत्र केले विकसित.

ट्रॅक्टरला जोडून वापरण्यासाठीचे दोन नोझल्स असलेले तणनाशक फवारणी यंत्रही केले तयार.

ॲग्रोवनची साथ,

शहाळ्याचा प्रयोग

मोरे पितापुत्र पहिल्या दिवसांपासून ॲग्रोवनचे वाचक आहेत. त्यातील द्राक्ष सल्ला, सेंद्रिय शेती, हवामान अंदाज, यशकथा, विविध पिकांचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आदी सर्व बाबींचा ते शेतात वापर करतात. कात्रणे काढून ती संग्रही ठेवली आहेत. ॲग्रोवनच्या माध्यमातूनच शहाळ्याच्या नारळाच्या सिंगापुरी, यलो ड्वार्फ आदी विविध वाणांची माहिती मिळाली. त्यातूनच त्याच्या लागवडीचा पर्याय पुढे आला. नारळशेती व वाणांविषयी सविस्तर धांडोळा घेत तीन वर्षापूर्वी आंध्रप्रदेशातून ग्रीन ड्वार्फ जातीच्या नारळाची रोपे आणून १८ बाय १८ फुटांवर २०० झाडांची लागवड केली आहे.

पुस्तकांचा व्यासंग

साहेबराव यांना पुस्तके वाचण्याचीही मोठी आवड आहे. त्यांच्या कपाटात इकिगाई भाग एक, दोन, तीन तसेच द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग यासह शेती व अन्य पुस्तके दिसून येतात. शेतीतील बारकावे डायरीत टिपून ठेवण्याची त्यांची पध्दत आहे.सातत्याने फिरत राहिल्याने त्यांनी मित्रपरिवारही जोडला. लोकांची पारख केल्याने त्यांच्या सानिध्यात आलेला माणूस कधीच दूर गेला नाही. त्यांच्या शेतातही लोकांचा सतत राबता असतो.

राहुल मोरे ९३०७६८१५५१

साहेबराव मोरे ९४०४२४२९३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com