Drought Mitigation Drive : सोलापुर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या टप्पा- दोनअंतर्गत सुरू असलेली ६२२ कामे अंतिम टप्प्यात असून, ती सप्टेंबरअखेर पूर्ण होणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबरपासून जलयुक्त शिवार टप्पा- तीनला सुरवात होणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाने दिली..भूजलपातळी वाढविणे, पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे आणि दुष्काळमुक्त गावे घडविणे या उद्देशाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत नाला खोलीकरण, शेततळी, सिमेंट व मातीचे बंधारे, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच नदी-नाले खोलीकरणाची विविध कामे करण्यात येत आहेत. या कामांचा भूजल वाढीसाठी फायदा होत असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत आहे..Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ ठप्प; ४०० कोटींची गरज.मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या टप्पा- दोनमध्ये जिल्ह्यासाठी ७१९ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी विशेष निधीतून ६२२ कामे हाती घेण्यात आली आहेत. कामे सप्टेंबरअखेर पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरपासून जलयुक्त शिवार टप्पा- तीन सुरू होणार आहे..Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ची कामे निकृष्ट; चार अधिकारी निलंबित.काही जिल्ह्यांना प्राथमिक आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप अधिकृत मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्याने आराखडा तयार करण्याचे काम सुरू झालेले नाही..जिल्ह्यात जलयुक्त शिवार टप्पा- दोनअंतर्गत सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात आहेत. सप्टेंबरअखेर ती पूर्ण होतील. त्यानंतर नोव्हेंबरपासून टप्पा-तीनला सुरवात होईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर टप्पा-तीनचा आराखडा तयार केला जाईल.- राहुल क्षीरसागर, कार्यकारी अभियंता, जलसंधारण, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.