Jitendra Awhad agrowon
ॲग्रो विशेष

NCP Crisis : राष्ट्रवादीत निलंबन, निवडीचे अधिकार शरद पवारांनाच, जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार गटावर टीका

Jitendra Awhad : अजित पवार यांच्या गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हटवून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली. त्या निवडीबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Team Agrowon

NCP Political Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गटाने बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसऱ्या अंकाची सुरुवात झाली आहे. यामध्ये अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली. यानंतर शरद पवार यांच्या गटातर्फे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत घेत प्रफुल्ल पटेल यांना पक्षांतर्गत निवड आणि निलंबन करण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात मैदानात उतरले आहे. जितेंद्र आव्हाड यांची पक्षप्रतोद आणि विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी विधीमंडळाचे गटनेते जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षानंतर अजित पवार गटही आक्रमक झाला. त्यांच्यावतीने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आले. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांना हटवून सुनील तटकरे यांची निवड केली. तसेच प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांनी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी भवनामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या निवडी आणि नियुक्त्या पक्षाच्या घटनेच्याविरोधात असून त्याला कोणताही अधिकारी नाही. कोणत्याही स्वरुपाच्या निवडी आणि निलंबन करण्याचे सर्वाधिकारी शरद पवार यांनाच आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ज्यांची राष्ट्रीय अध्यक्षांनी पक्षातून काढले त्यांनी इतर नियुक्त्या करणे कितपत योग्य हे कायदाच सांगेल. त्यामुळे त्यांनी केलेल्या सर्व निवडी बेकायदेशीर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT