Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने गेल्या महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

Team Agrowon

Crop Loss Survey In Yavatmal : अवकाळी पावसाने गेल्या महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात मदत प्रस्तावाचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे.

त्यापूर्वी खबरदारी म्हणून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी तहसीलदारांना तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सोमवारी (ता. ८) पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने जवळपास चार हजार हेक्टरचे नुकसान केले आहे. आंबा, भुईमूग, तीळ, फळबागा, भाजीपाला आदी पिकांना वादळीवारा, गारपीट तसेच पावसाचा फटका बसला आहे. नुकसानीनंतर तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

सातत्याने येणाऱ्या पावसाने नुकसानीचे क्षेत्र वाढत गेले. एप्रिल तसेच मे महिन्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे आहे. यातून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तहसीलदारांना तपासणीचे आदेश दिले आहेत.

पंचनामा अहवाल सादर झाल्यानंतर दोन दिवसात नुकसानभरपाई मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. आतापर्यंत जवळपास दोन हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

अवकाळी पावसाने नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून फेर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अवकाळी पावसाने उन्हाळी पिके भुईसपाट केली आहेत. कांदा, पालक, टमाटर आदी भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

मे महिन्यातील पंचनामे पूर्ण

एप्रिल महिन्यातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. १७ एप्रिलनंतर झालेल्या पावसाने नुकसानीचे क्षेत्र जास्त आहे. मे महिन्यातही पावसाने मोठे नुकसान झाले.

या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून दोन महिन्यातील मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनच्या आधीच होईल, कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Medical Assistance Fund: वैद्यकीय साह्यता निधीतून २० कोटींची मदत

Fertilizer Demand: खरिपासाठी १.७४ लाख टन खतांची गरज

Tiger Attack: पशुधन विकास अधिकाऱ्यांसह चौघांवर वाघाचा हल्ला

Jairam Ramesh: अमेरिका-इराण चर्चेत पाकिस्तान बनला शांतिदूत?; मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला धक्का, काँग्रेसची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT