Ajit Pawar and Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Rohit Pawar: दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे भाष्य करतील : रोहित पवार

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे परदेशातून परत आल्यावर सविस्तर भाष्य करतील, असे स्पष्ट केले आहे.

Team Agrowon

Pune News: गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे परदेशातून आल्यावर त्यावर भाष्य करतील, असे सूचक वक्तव्य केले आहे

‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?’ असा प्रश्‍न पत्रकारांनी रोहित पवार यांना विचारल्यावर आमदार रोहित पवार म्हणाले, की हा प्रश्न जसा तुम्हाला पडला आहे तसाच अनेकांना पडला आहे. परंतु आजपर्यंतची ही फक्त चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवरून आम्हाला याबाबत काही कळाले नाही, काही कळाल्यास तुम्हाला नक्की सांगू.

‘‘सुप्रियाताई काय भूमिका घेणार? हे बघावे लागेल. पक्षाची जबाबदारी सुप्रियाताई यांच्यावर आहे. त्यामुळे ताईच निर्णय घेतील. सुप्रियाताई सध्या परदेशात आहेत. मोदी यांनी अनेक पक्षाच्या नेत्यांवर जबाबदारी टाकली आहे.

सुप्रियाताई राजकारण बाजूला ठेवून भारतासाठी परदेशात गेल्या आहेत. त्या परदेशातून आल्यावर सविस्तर भाष्य करतील,’’ असे रोहित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा

Urea Fertilizer Alternatives: युरिया खताला पर्यायी खते कोणती?

Animal Vaccination Camp: मुरादपूर येथे जनावरांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण शिबिर

Argentina Agriculture Market: अर्जेंटिनामध्ये फळे, प्रक्रिया उत्पादनांना मागणी

Summer Health Safety: उष्माघात दक्षतेबाबत यंत्रणा सुसज्ज ठेवा

SCROLL FOR NEXT