Indian Meteorological Department: जगभरातील हवामान संस्थांनी यंदाच्या मॉन्सूनवर ‘एल निनो’चे सावट असल्याचे भाकीत वर्तविले आहे. एल निनो सक्रिय झाला असून, मॉन्सून हंगामात त्याची तीव्रता वाढणार असल्याच्या वृत्ताला भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दुजोरा दिला आहे. यातच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देखील तटस्थ राहण्याच्या अंदाजाने मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टिम या प्रारूपानुसार नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात मध्यम ते तीव्र एल निनोची स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. हिंद महासागरावरील तीन महिन्यांचा हंगामी सरासरी तापमान वाढीचा अंदाज पाहता, मॉन्सून हंगामामध्ये हिंद महासागराच्या बहुतांश भागांच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या हिंद महासागरात तटस्थ इंडियन ओशन डायपोल स्थिती असून, ती मॉन्सून हंगामाच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता अधिक असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे..EL Nino Warning: ‘एल निनो’चा इशारा गांभीर्याने घ्यावा : डॉ. सहाय.एल निनोच्या काळात सामान्यतः भारतीय मॉन्सून कमकुवत असण्याची शक्यता अधिक मानली जाते. मात्र त्याच वेळी आयओडी सकारात्मक (पॉझिटिव्ह) असेल, तर एल निनोचा परिणाम तो काही अंशी कमी करू शकतो. परिणामी मॉन्सूच्या काळात चांगला पाऊस होऊ शकतो..यंदाच्या मॉन्सून हंगामाच्या उत्तरार्धात आयओडी सकारात्मक होण्याची शक्यता होती. मात्र आता हवामान विभागाने संपूर्ण मॉन्सून हंगामात ‘आयओडी’ तटस्थ राहणार असल्याचा सुधारित अंदाज जारी केला आहे. त्यामुळे त्याचा मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे..El Nino Impact: कृषिक्षेत्राला ‘एल निनो’च्या झळा; भारतीय रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवालात इशारा.हवामान विभागाच्या अहवालानुसार, मे महिन्यात विषुववृत्तीय मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. पूर्व प्रशांत महासागर, मेरीटाइम कॉन्टिनेंट आणि पश्चिम प्रशांत महासागराच्या काही भागांमध्ये तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. उत्तर आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या उष्णकटिबंधीय तसेच बाह्य-उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त समुद्र पृष्ठभागाचे तापमान नोंदविण्यात आले आहे..यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही सरासरीपेक्षा जास्त तापमान आढळून आले आहे. एप्रिलच्या तुलनेत, मे महिन्यात पूर्व हिंद महासागर, उत्तर अरबी समुद्र आणि उत्तर बंगालचा उपसागर या भागांमध्ये सरासरी तापमानात वाढ झाली आहे..प्रशांत महासागरावरील तीन महिन्यांचा हंगामी सरासरी समुद्र पृष्ठभागाच्या तापमानाचा अंदाज विचारात घेता, जून ते ऑगस्ट या दरम्यान मध्य विषुववृत्तीय तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या कालावधील तापमानात वाढ होऊन मध्य तसेच पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ होऊन एल निनोला बळकटी मिळण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.