Sunflower sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Sowing : खानदेशात सूर्यफूल पेरणी स्थिर राहणार

Rabi Sowing : खानदेशात यंदा सूर्यफूल पिकाखालील क्षेत्र सुमारे अडीच हजार हेक्टरवर स्थिर राहू शकते.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा सूर्यफूल पिकाखालील क्षेत्र सुमारे अडीच हजार हेक्टरवर स्थिर राहू शकते. पेरणी पुढील पंधरवड्यात तापी व गिरणा पट्ट्यात सुरू होईल, असे संकेत आहेत. सूर्यफुलाची लागवड किंवा पेरणी २०२१ मध्ये रब्बी हंगामात सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली होती.

पण कमी दर व उत्पादन हवे तसे न आल्याने २०२२ मध्ये लागवड घटली. खरिपातही लागवड कमी झाली होती. परंतु आता रब्बीत बेवड व कमी पाण्यात येणारे पीक म्हणून तापी, गिरणा नदीच्या क्षेत्रात सूर्यफूलाची पेरणी केली जाईल, अशी स्थिती आहे.

सूर्यफुलाचे बियाणे यंदा मुबलक आहे. परंतु पेरणी वाढणार नाही किंवा स्थिर राहील, असे दिसत आहे. बियाण्याचे दरही स्थिर आहेत. पेरणीसंबंधी शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. मागील वर्षभर सूर्यफुलाचे दर कमी किंवा अपेक्षेएवढे मिळालेले नाहीत.

पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल, असे दर मिळाले आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, पाचोरा, एरंडोल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारामधील शहादा तालुक्यात सूर्यफुलाची पेरणी होईल.

जळगाव जिल्ह्यात चोपडा व जळगावात पेऱणी अधिकची राहील, असे सांगितले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र १७०० ते १८०० हेक्टरवर राहील, असाही अंदाज आहे. सूर्यफुलाची पेरणी कांदेबाद केळी, सोयाबीन व कापूस पिकाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात केली जाईल.

अनेक शेतकरी त्यासाठी सध्या शेतीची पूर्वमशागत करीत आहेत. ९५ टक्के काढणी झालेल्या कांदेबाग केळी बागांचे अवशेष जमिनीत गाडले जात आहेत. त्यात पुन्हा शेत भुसभुशीत करून नंतर पेरणी केली जाईल.

काही शेतकरी पऱ्हाटीसह कापूस पिकात रोटाव्हेटर करून घेत आहेत. नंतर शेत भुसभुशीत करून घेतले जात आहे. पेरणी या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असेही संकेत आहेत. कारण दिवाळी सणानिमित्त शेतीकामे संथ सुरू आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांना आपल्या शेताची पूर्वमशागत करून घेताना अडचणी येत आहेत.

भुईमूग लागवड सुरू

खानदेशात आगाप भुईमूग लागवड सुरू झाली आहे. भुईमूग लागवडीत जळगावमधील चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर हे तालुके आघाडीवर आहेत. या तालुक्यांत मिळून ८०० ते ९०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी यंदा होईल, असेही चित्र आहे. डिसेंबरमध्ये लागवड सुरू राहील, असे सांगण्यात आले. चोपड्यातील खर्डी, लोणी, मंगरूळ, वर्डी, माचले, अडावद या भागात पेरणी स्थिर राहू शकते, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम

Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे

Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने

Dams Status: आवक घटल्याने प्रकल्पांची पाणीपातळी स्थिर

SCROLL FOR NEXT