Rabi sowing : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत मिळून अवघी ३५ टक्के रब्बी पेरणी

Rabi Season : मराठवाड्यातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव या पाच जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३५ टक्के म्हणजे ४ लाख ८८ हजार २० हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
Published on
Updated on

Latur News : मराठवाड्यातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव या पाच जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३५ टक्के म्हणजे ४ लाख ८८ हजार २० हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. पाऊस व्हावी खरिपाची झालेली वाताहात आणि आता रब्बीच्या पेरणीवरील संकट दुष्काळाची तीव्रता दर्शविते आहे.

मराठवाड्यातील लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाचही जिल्ह्यांत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये लातूरमधील २ लाख ८० हजार ४३९ हेक्टर, धाराशिवमधील ४ लाख ११ हजार १७२ हेक्टर, नांदेडमधील २ लाख २४ हजार ६३४ हेक्टर, परभणीतील २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर, तर हिंगोलीतील १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या या क्षेत्रापैकी केवळ ४ लाख ८८ हजार हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : खानदेशातील रब्बी पेरणी ३० टक्के पूर्ण

पाचही जिल्ह्यांत परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणी सर्वात कमी केवळ १४ टक्के तर त्यानंतर हिंगोली २२.०२ टक्के, धाराशिव २६.८२ टक्के, नांदेड ३५.५३ टक्के असा क्रम आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक रब्बी पेरणी लातूर जिल्ह्यात ७८.७७ टक्के झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

पिकांची अपेक्षित पेरणी नाहीच

पाचही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असलेल्या रब्बी ज्वारीची प्रत्यक्षात ९८ हजार ९१५ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ १३,४१५ हेक्टरवर पेरणी झाली. हरभऱ्याच सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६,१२४ हेक्टर असताना प्रत्यक्षात तीन लाख ५९ हजार २९८ हेक्टरवरच हरभऱ्याची पेरणी झाली.

Rabi Sowing
Rabi Sowing : नांदेडात ७० हजार हेक्टरवर पेरणी

मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र १७९७१ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ २०५१ हेक्टरवर मका पेरणी झाली. करडईचे सर्वसाधारण क्षेत्र १९५३१ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ १२५०९ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली. सर्वच पिकं उगवणी आणि वाढीच्या अवस्थेत आहेत. कोणत्याही पिकांची अद्याप अपेक्षित पेरणी झाली नाही.

जिल्हानिहाय प्रत्यक्ष पेरणी

झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

लातूर २२०९०७

धाराशिव ११०२८०

परभणी ३८०६२

हिंगोली ३८९५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com