Sunflower Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Seeds : सूर्यफूल बिया : पौष्टिक सुपरफूड

Team Agrowon

ऐश्‍वर्या मुजुमले, डॉ. सुरेंद्र सदावर्ते

Agriculture News : सोयाबीन तेलानंतर सूर्यफूल खाद्यतेल उत्पादनात जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेल्या प्रथिनांमध्ये अमिनो ॲसिड असते. याव्यतिरिक्त टोकोफेरॉल खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.

अर्धा कप कोरड्या भाजलेल्या सूर्यफुलाच्या बियांमध्ये ३७० ऊर्जा, सात ग्रॅम तंतू आणि १२ ग्रॅम प्रथिने, जीवनसत्त्व ई १७ ग्रॅम आणि पेंटोथेनिक अॅसिड पाच मिलिग्रॅम असते. सूर्यफुलाच्या बियामध्ये कॅल्शिअम, तांबे, लोह, मॅग्नेशिअम, मँगेनीज, सेलेनियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात.

सूर्यफूल तेलामध्ये ओलिइक ॲसिड आणि लिनोलेइक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. हे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करते. सूर्यफूल तेल हे जीवनसत्त्व ई आणि टोकोफेरॉलचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. बियांमध्ये असलेले ट्रिप्टोफॅन आणि कोलिन चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. सूर्यफूल बिया हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक सुपरफूड आहे.

आरोग्यदायी फायदे

सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रतिकारकशक्ती वाढवणारे जीवनसत्त्व ई, जस्त आणि सेलेनियम असते.

जीवनसत्त्व ई रोगप्रतिकारशक्ती वाढवते. संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करते. शरीरातील निरोगी पेशींना नुकसान होण्यापासून प्रतिबंध करते.

जस्त आपल्या शरीराला जळजळ होण्यापासून वाचवते. संक्रमणास प्रतिबंध करते, प्रतिकारशक्ती वाढवते.

बियाण्यातील तंतुमय घटक रक्तातील एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. नियासिन किंवा जीवनसत्त्व बी ३ एकूण कोलेस्ट्रॉल पातळीवर नियंत्रण ठेवते. बियांमधील जीवनसत्त्व किंवा पेंटोथेनिक अॅसिड एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते. एकूण सीरम कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.

बीटा सीटोस्टेरॉल हे फायटोस्टेरॉल स्तनाचा कर्करोग रोखण्यास मदत करते. ट्यूमर पेशींचा वाढीस प्रतिबंध करते, ट्यूमरचा आकार कमी करते. कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

जीवनसत्त्व बी ६ मुळे मूड आणि एकाग्रता सुधारते. स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. प्रीमेनस्टुअल सिंड्रोमशी संबंधित लक्षणे कमी करण्यास देखील मदत करते.

बियांमध्ये भरपूर प्रथिने आणि तंतुमय घटक असतात. ते आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव देतात. आपले अन्न सेवन कमी करतात, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

थायमिनचा चांगला स्रोत आहे. जीवनसत्त्व बी १ अन्नामध्ये असलेले कार्बोहाइड्रेट, प्रथिने आणि चरबीचे विघटन करण्यास मदत करते. स्नायू तयार करण्यास मदत करते. मूठभर सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्यावर तुम्हाला ऊर्जा मिळू शकते.

अनेमियाच्या उपचारात मदत मिळते. बियांचे सेवन केल्याने लोहाची पातळी वाढण्यास मदत होते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

आपली त्वचा चमकदार राहते. बियांमधील ओलिक, लिनोलिक अॅसिड कोलेजन आणि इलास्टीन तयार करण्यास मदत करतात. जखमेच्या उपचारांना गती देतात. चट्टे तयार होण्यास देखील प्रतिबंध करतात.

जीवनसत्त्व ई हे जन्मपूर्व आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर म्हणून आहे. गर्भवती महिलांचे आरोग्य आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

दीर्घकाळ जळजळ असलेल्या लोकांनी आहारात बियाचे सेवन करावे. सूप आणि सॅलडमध्ये वापर करता येतो. दाहक विरोधी गुणधर्म यांचा समावेश होतो तज्ज्ञांना असे आढळून आले आहे आठवड्यातून तीन ते पाच वेळा तुमच्या कोणत्याही जेवणाचा एक भाग म्हणून सूर्यफुलाचा बियांचे सेवन केल्याने सांधेदुखी यांसारख्या जुनाट

स्थितीची असुरक्षा लक्षणीयरीत्या कमी होते.

प्रक्रिया उद्योगात वापर

स्नॅकिंग : भाजलेले आणि खारवलेले सूर्यफूल बी हे एक लोकप्रिय स्नॅक पदार्थ आहे.

बेकिंग : सूर्यफुलाच्या बिया ब्रेड, मफिन्स, कुकीजमध्ये वापरतात.

सॅलड टॉपिंग : चव वाढविण्यासाठी सॅलडसोबत बिया वापरल्या जातात.

सुकामेवा : चविष्ट आणि पौष्टिक सुकामेवा, चॉकलेटमध्ये वापर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT