Sunflower sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Sowing : कृषी विभागाकडून ३०० हेक्टरवर सूर्यफूल प्रकल्प

Sunflower Production : खरीप हंगामात सूर्यफुलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभाग भर देणार असून, त्यासाठीचे प्रात्यक्षिक म्हणून सूर्यफूल प्रकल्प जिल्ह्यात राबविला जाणार आहे.

Team Agrowon

Satara News : खरीप हंगामात सूर्यफुलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभाग भर देणार असून, त्यासाठीचे प्रात्यक्षिक म्हणून सूर्यफूल प्रकल्प जिल्ह्यात राबविला जाणार आहे. यामध्ये तीनशे हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची पेरणी केली जाणार आहे. या सूर्यफुलाचे उत्पादन शेतकऱ्यांकडून खरेदी करावे, यासाठीही कृषी विभागाने आत्तापासून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीने क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढत आहे; पण दराअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळत नाही. त्यामुळे वर्षभर सोयाबीन ठेऊन शेतकरी चांगल्या दराची वाट पाहात असतात. यातून मार्ग काढण्यासाठी कृषी विभाग प्रत्येक वर्षी विविध प्रकल्प राबवते. आतापर्यंत सोयाबीन, बाजरी आदींचे प्रकल्प होत असतात; पण आता यावर्षी कृषी विभागाने प्रात्यक्षिक म्हणून सूर्यफूल प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये सुमारे ३०० हेक्टरवर सूर्यफुलाचे पेरणी केली जाणार आहे. या प्रात्यक्षिक प्रकल्पात जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करणार आहे. कृषी विभागाकडून या प्रकल्पासाठी बियाणे, बिजप्रक्रिया लागणारे साहित्य, पूरक तणनाशक याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

या सूर्यफूल प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांचे सूर्यफुलाचे उत्पादन ऑइल मिल अथवा कंपन्यांनी खरेदी करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करणार आहे. सूर्यफुलाला चार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाल्यास यातून आर्थिक फायदाही होणार आहे.

प्रत्येक वर्षी सोयाबीन, बाजरी आदी प्रकल्प कृषी विभागाच्या वतीने राबविले जातात; पण या वर्षी आम्ही जिल्ह्यात सूर्यफूल प्रकल्प राबविणार आहोत. त्यासाठी तीनशे हेक्टरवर पेरणी केली जाणार असून, शेतकऱ्यांचा जास्तीतजास्त सहभागी करून घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत, तसेच यातून मिळणारे उत्पादन मिल मालकांच्या मदतीने पुन्हा खरेदी करण्याबाबतही प्रयत्न केले जाणार आहेत.
- भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT