Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Soybean : खानदेशात उन्हाळ सोयाबीनचे क्षेत्र स्थिर

Summer Sowing : खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा स्थिर आहे. पेरणी २४०० हेक्टरवर झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा स्थिर आहे. पेरणी २४०० हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २१०० हेक्टरपर्यंत असल्याची माहिती आहे.

धुळे व नंदुरबारात उन्हाळ सोयाबीनची पेरणी फारशी केली जात नाही. या भागात कृत्रीम जलसाठाधारकांनी सोयाबीनऐवजी भुईमुगास पसंती दिली आहे.

थंडी अधिक पडेल व सोयाबीनचे उत्पादन घटेल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. यामुळे नंदुरबार, धुळ्यातील पेरणी घटली आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीनची पेरणी मागील महिन्यातच झाली आहे.

त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात आली आहे. पाण्याची अडचण असल्याने किंवा इतर पिकांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन केले आहे.

सोयाबीनचे दर यंदा खरिपात बऱ्यापैकी होते. किमान ४४०० व कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर अनेकांना हंगामात मिळाला. नंतरही दर टिकून होते. पेरणीच्या वेळेसही दर ४८०० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

यामुळे सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. परंतु मागील आठवड्यात दरात पडझड झाली असून, दर ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. दर टिकून राहतील व अधिकचा नफा मिळेल, या नियोजनातून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे.

सोयाबीनची पेरणी धुळे, नंदुरबारात वाढण्याची शक्यता कमी पावसाने सुरुवातीलाच मावळली होती. काही भागांत आतापासून टंचाई आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे अनेकांनी पेरणी टाळली आहे. यामुळे यंदा सोयाबीन क्षेत्रवाढीस अडथळा आल्याचे चित्र खानदेशात आहे.

सोयाबीन पीक अनेकांचे सव्वा महिन्याचे झाले आहे. काहींचे पीक दीड महिन्याचे झाले आहे. पेरणी डिसेंबरच्या सुरुवातीलाच अनेकांनी केली होती. यामुळे काही शेतकऱ्यांचे पीक ४६ ते ५० दिवसांचे देखील आहे.

पीक बऱ्यापैकी आहे. त्यात ढगाळ वातावरणामुळे दोन वेळेस कीडनाशके व इतर फवारण्या घ्याव्या लागल्या आहेत. तसेच त्यात आंतरमशागतदेखील एक वेळेस झाली आहे. पीक बऱ्यापैकी आहे. त्यात एक वेळेस रासायनिक खतही अनेकांनी दिले आहे. काळ्या कसदार जमिनीतील पीक चांगले असून, वाढ होत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी लहान फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी खरिपात उत्पादन घेतल्यानंतर आपल्याकडील बियाण्याची उगवणक्षमता तपासून त्यावर बीजप्रक्रिया करून पेरणी केली आहे. यामुळे बियाण्यावरील मोठा खर्च शेतकऱ्यांनी कमी केल्याची माहिती मिळाली.

पेरणी गिरणा, तापीकाठालागत अधिक

सोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीन रावेर भागात कमी आहे. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात उन्हाळ सोयाबीन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT