Latur News : विभागाचे उन्हाळी हंगामातील सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी २४ हजार ९९१ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३४.८६ टक्क्यावर झाली आहे. दुसरीकडे रब्बी पिकांची काढणी सुरू असून काही ठिकाणी ती आटोपली आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान थंड व कोरडे होते. विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ६२९.८४ मिलिमीटर पाऊस झाला. तो ३१ ऑक्टोबरच्या सरासरीच्या ७७ टक्के आहे. वार्षिक सरासरीच्या ७७ टक्के इतका पाऊस झालेला आहे.
लातूर विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर असून २७ लाख ९६ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर १०१ टक्के प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. लातूर विभागाचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी १५ लाख ९२ हजार ५८६.२१ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११६.७६ टक्क्यांवर झाली आहे.
रब्बी हंगाम पीक निहाय स्थिती
रब्बी ज्वारी : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून प्रत्यक्षात ३ लाख ९२ हजार ८१४.५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १०५.६४ टक्के आहे. पीक सध्या पक्वतेच्या ते काढणी अवस्थेत आहे. काही ठिकाणी लवकर पेरणी झालेल्या ज्वारीची काढणी सुरु आहे
गहू : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असून प्रत्यक्षात १ लाख ३० हजार ४०६.९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ८३.३२ टक्के आहे. पीक सध्या पक्वतेच्या ते काढणी अवस्थेत आहे. काही ठिकाणी लवकर पेरणी झालेल्या गहु पिकाची काढणी सुरु आहे.
हरभरा : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असून प्रत्यक्षात १० लाख ०९ हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १२८.३५ टक्के आहे. पिकाची सध्या काढणी सुरु असून ६५ ते ७० टक्के काढणी झाली आहे.
करडई : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असून प्रत्यक्षात ३४ हजार ८४२.९८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १७८.४० टक्के आहे. पीक सध्या पक्वतेच्या ते काढणी अवस्थेत आहे.
उन्हाळी पीक स्थिती
उन्हाळी भुईमूग : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर असून आत्तापर्यंत १२ हजार ४९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत त्याची टक्केवारी ४७ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.
उन्हाळी मका : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८०५७ हेक्टर असून आत्तापर्यंत ३२४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ४० टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.
जिल्हानिहाय उन्हाळी सरासरी व प्रत्यक्ष
पेरणी क्षेत्र(हेक्टरमध्ये), टक्केवारी
जिल्हा सरासरी प्रत्यक्ष टक्केवारी
लातूर २३९६ ५५५.५० २३.१८
धाराशिव ९५५५ ९६० १०.०५
नांदेड २२ हजार ४४१ १४ हजार १८९ ६३.२३
परभणी १० हजार ९५८ १२०२ १०.९७
हिंगोली २६ हजार ३४८ ८०८५ ३०.६८
एकूण ७१ हजार ७०० २४ हजार ९९१ ३४.८६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.