Kardai Sowing : नांदेडला दहा हजार हेक्टरवर करडईची पेरणी

Kardai Farming : नांदेड जिल्ह्यात रब्बीमध्ये दरवर्षी पेरणी होणाऱ्या सर्वसाधारण क्षेत्राच्या १५५ टक्क्यांनुसार तीन लाख ४८ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावर यंदा पेरणी झाली आहे.
Kardai
Kardai Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात यंदा करडईच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण नऊ हजार ७७८ हेक्टरवर करडई पेरण्यात आली आहे. यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र देगलूर तालुक्यात पाच हजार २५४ हेक्टर असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिले.

जिल्ह्यात रब्बीमध्ये दरवर्षी पेरणी होणाऱ्या सर्वसाधारण क्षेत्राच्या १५५ टक्क्यांनुसार तीन लाख ४८ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावर यंदा पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा तर दहा हजार हेक्टरवर करडईची पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

Kardai
Kardai Sowing : करडईची एक हजार १६९ हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यात यंदा मॉन्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे रब्बीत पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये हरभरा, करडई, गहू तसेच रब्बी ज्वारी पेरणीला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी पेरणीक्षेत्र एक लाख ५३ हजार ३७० हेक्टर असताना १५४.३९ टक्क्यांनुसार दोन लाख ३६ हजार ७९० हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे.

Kardai
Kardai Cultivation : जिरायती करडईचे वाढतेय महत्त्व

तर गव्हाचे सरासरी पेरणी क्षेत्र २९ हजार ७१३ हेक्टर असताना १३१.४३ टक्क्यांनुसार ३९ हजार ५३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. तर ३२ हजार ६९९ हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्र असताना शेतकऱ्यांनी ५० हजार ७११ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय करडई पेरणी क्षेत्र

जिल्ह्यात करडईचे सरासरी क्षेत्र २४६४ हेक्टर आहे. परंतु यंदा ३९६.७९ टक्क्यांनुसार ९७७८ हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे. ही करडई जिल्ह्यात सर्वाधीक पाच हजार २५४ हेक्टरवर देगलूर तालुक्यात झाली आहे. यानंतर १३०० हेक्टरवर बिलोली, १२०२ हेक्टरवर मुखेड, ६३४ हेक्टर कंधार, ६६३ हेक्टर नायगाव, २४२ हेक्टर धर्माबाद, १९० हेक्टर लोहा, ९५ हेक्टर उमरी, ७० हेक्टर हदगाव, चाळीस हेक्टर किनवट, ३९ हेक्टर नायगाव या प्रमाणे करडईचा पेरा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com