Summer Sowing : उन्हाळी पिकांची ७ हजारांवर हेक्टरवर पेरा

Sowing Update : परभणी जिल्ह्यात ७१ हेक्टर (०.६५ टक्का) आणि हिंगोली जिल्ह्यात ७ हजार ३२ हेक्टर (२६.६९ टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून ७ हजार १०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Sowing
SowingAgrowon

Parbhani News : दुष्काळी स्थितीमुळे सिंचन स्रोतांना पाणी नसल्यामुळे यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामात परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. शुक्रवार (ता. २३)पर्यंत परभणी जिल्ह्यात ७१ हेक्टर (०.६५ टक्का) आणि हिंगोली जिल्ह्यात ७ हजार ३२ हेक्टर (२६.६९ टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून ७ हजार १०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात भुईमुगाचे क्षेत्र अधिक आहे.

परभणी जिल्ह्यात गतवर्षी (२०२३) पर्जन्यमानात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के तूट झालेली आहे. त्यामुळे सिंचन स्रोतांना पाणी उपलब्ध नाही. परिणामी, यंदाच्या उन्हाळी हंगामातील पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी १० हजार ९५८ हेक्टर आहे. परंतु शुक्रवार (ता. २३) पर्यंत केवळ ७१ हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद आहे.

Sowing
Summer Sowing : सांगलीत एक हजार हेक्टरवर उन्हाळी पीक पेरा

त्यात गळीत धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ७१ हेक्टरवर (०.७५ टक्का) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी ७१ हेक्टर, सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ हजार ६६२ हेक्टर, तिळाचे सरासरी क्षेत्र ११.२४ हेक्टर आहे. कडधान्यांचे सरासरी क्षेत्र ४९.०७ हेक्टर आहे. त्यात मुगाचे ३२.४ हेक्टर आहे. जायकवाडी धरणातून यंदा उन्हाळी आवर्तनाचे नियोजन नाही.

माजलगाव, निम्न दुधना प्रकल्पात अत्यंत अल्प पाणीसाठा असून, अनेक लघू तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी कमी झाली आहे. सिद्धेश्वर धरणाच्या लाभक्षेत्रात तसेच सिंचनासाठी खात्रीशीर पाणी असलेल्या भागात उन्हाळी भुईमूग, चारा पिकांचा पेरा आहे. कृषी विभागाकडे आजवर केवळ सेलू तालुक्यातील पेरणीची नोंद झाली, परंतु परभणी, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील पेरणी क्षेत्राची झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर आहे.

Sowing
Rabi Sowing : नांदेडला रब्बीचा साडेतीन लाख हेक्टरवर पेरा

शुक्रवार (ता. २३) पर्यंत ७ हजार ३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी ६ हजार ८०४ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ४६३.९९ पैकी ६ हजार २३४ हेक्टर (९६.४४ टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ५७० हेक्टर (६.७९ टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सिद्धेश्वर व इसापूर धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाकडे आजवर औंढा नागनाथ व सेनगाव या दोन तालुक्यातील पेरणीची नोंद झाली परंतु हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यातील पेरणी क्षेत्राची नोंद झालेली नाही.

परभणी हिंगोली जिल्हा उन्हाळी हंगाम २०२४ पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) शुक्रवार (ता.२३)पर्यंत

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्के

परभणी ३१०० ०० ००

जिंतूर ३९७५ ०० ००

सेलू २८० ७१ २५.३०

मानवत ५५८ ०० ००

पाथरी ४२२ ०० ००

सोनपेठ ४५९ ०० ००

गंगाखेड ५८५ ०० ००

पालम ३१२ ०० ००

पूर्णा १२६३ ०० ००

हिंगोली २७८१ ०० ००

कळमनुरी १९८५ ०० ००

वसमत १३२६४ ०० ००

औंढा नागनाथ २१२० ६३७० ३००.४७

सेनगाव ६१९६ ६६२ १०.६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com