आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीनमध्ये चढ उतारदेशात सोयाबीनच्या भावात २ दिवसांपासून काहीसे चढ उतार पाहायला मिळत आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव काहीसे नरमले आहेत. आज प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ५५० ते ५ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक मर्यादीत आहे. त्यामुळे काहीसे चढ उतार दिसत असले तरी सोयाबीनची भावापातळी स्थिर राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस स्थिरदेशातील बाजारात कापूस भाव दबावातच आहेत. कापसाला पुढे उठाव कमी असल्याचे व्यापारी आणि उद्योगांकडून सांगितले जात आहे. युध्दामुळे कापड निर्यातीवर परिणाम होत आहे. निर्यातीसाठी खर्च वाढला आहे. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेच्या बाजारातील निर्यातीवर परिणाम होत आहे. याचा दबाव कापूस भावावर येत आहे. सध्या बाजारात कापूस प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. सीसीआयची कापूस विक्रीही सुरुच आहे. त्यामुळे कापूस बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: गहू दरावर दबाव; सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, बेदाण्याला उठाव तर भेंडीचे दर टिकून.टोमॅचो आवक सुधारलीराज्यातील बाजारात टोमॅटोच्या भावात काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. बाजारातील आवक सुधारल्यानंतर दरावर दबाव आला होता. दुसरीकडे टोमॅटोला उठावही चांगला असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या राज्यातील अनेक भागात तोडे सुरु आहेत. यामुळे आवक चांगली आहे. सध्या टोमॅटो राज्यात मोठ्या बाजार समित्यांमध्ये सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. टोमॅटोची आवक पुढील काही दिवस स्थिर दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .Agrowon Podcast: केळीला चांगला उठाव; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसात चढ उतार, आल्याचे भाव टिकून तर गवारचे भाव तेजीत.डाळिंबाला उठावराज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासत आहे. याचा आधार दराला मिळत आहे. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारले आहेत. सध्या डाळिंब बाजारात ८ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .मिरचीला उठाव टिकून राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाही. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.