Summer Crop Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Crop Sowing : उन्हाळी पिकांची १९ हजार ४२९ हेक्टरवर पेरणी

Summer Groundnut Sowing : हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर असतांना यंदा प्रत्यक्षात १९ हजार ४२९.१५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Hingoli News : यावर्षीच्या (२०२५) उन्हाळी हंगामातील अंतिम पेरणी क्षेत्रानुसार हिंगोली जिल्ह्यात १९ हजार ४२९ हेक्टरवर (७३.७३ टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या (२०२४) तुलनेत यंदा उन्हाळी पेऱ्यात ९९१ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदाच्या उन्हाळी पेरणीत भुईमुगाचा पेरा सर्वाधिक म्हणजे १३ हजार २५३ हेक्टर आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. मूग, तीळ, सूर्यफूल पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र २६ हजार ३४८ हेक्टर असतांना यंदा प्रत्यक्षात १९ हजार ४२९.१५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदाच्या पेरणीत ६ हजार ९१९ हेक्टरने घट झाली आहे.

उन्हाळी गळीत धान्यांची १४ हजार ८५६ हेक्टर पैकी १४ हजार ८३० हेक्टरवर (९९.८२ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६ हजार ४६३ हेक्टर असतांना यंदा प्रत्यक्षात १३ हजार २५३ हेक्टर (२०५.०५ टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी२८१ हेक्टर (३.३४टक्के)पेरणी झाली आहे. तिळाची १ हजार २३१ हेक्टर तर सुर्यफुलाची ६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी १ हजार १४९ हेक्टर (२०.७७ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची १ हजार ९१२ पैकी १ हजार २३१ हेक्टर (६४.३८ टक्के), उडदाची ३ हजार ५४८ पैकी १३१ हेक्टर (३.६९ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी २ हजार५६६ हेक्टरवर (४३.०३टक्के) पेरणी झाली.

त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ हजार ९५ असतांना २ हजार १५१ हेक्टर (१९६.४३ टक्के), मक्याची १ हजार २ पैकी ४१५ हेक्टर (४१.४१ टक्के) पेरणी झाली आहे. यंदा हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तर वसमत, सेनगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली आहे. गतवर्षी (२०२४) हिंगोली जिल्ह्यात १८ हजार ४३८ हेक्टरवर (६९.९८ टक्के) पेरणी झाली होती.

हिंगोली जिल्हा उन्हाळी हंगाम २०२५ तालुकानिहाय

पेरणी क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हिंगोली २७८१ ३०९६ १११.३२

कळमनुरी १९८५ ४९०८ २४७.२५

वसमत १३२६४ २१९० १६.५१

औढानागनाथ २१२० ४८०० २२६.४१

सेनगाव ६१९६ ४४३४ ७१.५६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT