Bajari Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Crop : खेडमध्ये उन्हाळी बाजरीचे पीक जोमात

Summer Crop : खेड तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील तसेच उन्हाळी हंगामातील बाजरीची पिके जोरात आहेत. खेड तालुक्यात सुमारे सोळाशे हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले जात आहे.

Team Agrowon

Pune News : खेड तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील तसेच उन्हाळी हंगामातील बाजरीची पिके जोरात आहेत. खेड तालुक्यात सुमारे सोळाशे हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले जात आहे. यंदा पाणीटंचाई जाणवत असल्याने पिकाचे क्षेत्र जिल्ह्यात घटले आहे असे वास्तव आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाळी खरीप हंगामात तसेच रब्बी व उन्हाळी हंगामात बाजरीचे पीक घेतले जाते. बाजरीला दिवसेंदिवस मागणी वाढलेली आहे. बाजरीचे दरही प्रतिकिलोला पंचवीस ते तीस रुपये घाऊक बाजारात आहेत.

बाजरीची भाकरी खाण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. शेतकरी पुन्हा बाजरी पीक घेण्याकडे मोठ्या प्रमाणात वळतो आहे. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाळ्यातील बाजरीचे पीक घेतले जाते तसेच रब्बी (हिवाळ्यात) हंगामात बाजरीचे पीक घेतले जाते.

त्यानंतर उन्हाळ्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्याच्या कालावधीत बाजरीचे पीक घेतले जाते. साधारणपणे बटाटा कांदा पिकाची काढणी केल्यानंतर काही शेतकरी बाजरीचे पीक घेतात. हे पीक साधारणपणे मे अखेरीस तसेच जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात काढण्यास येते. पावसाळी बाजरी बरोबर उन्हाळी बाजरी ला महत्त्व येत आहे.

खेड तालुक्यात यावर्षी सुमारे दोनशे हेक्टर बाजरीचे क्षेत्र घटले आहे. यावर्षी खेड तालुक्यात उन्हाळी बाजरीचे सुमारे १६०५ हेक्टर क्षेत्र आहे. उन्हाळी बाजरी पिकाला शेतकरी अधिक पसंती देतात.
- नंदकुमार वाणी, खेड तालुका कृषी अधिकारी
पावसाळी बाजरीचे उत्पादन घटले आहे. उन्हाळी बाजरीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. उन्हाळी बाजरीला ही मागणी वाढलेली आहे. बाजरीला घाऊक बाजारात प्रतिकिलो २५ ते ३० रुपये भाव मिळत आहे.
- किशोर नहार, बाजरीचे व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Demonstration: पैठण तालुक्यात ८२० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Climate Change Agriculture: बदलत्या हवामानाला अनुसरून नव्या संशोधनाची गरज

Disciplinary Action: बदलीसाठी दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

Maharashtra Fruit Farming: द्राक्ष, डाळिंब, केळीत भविष्य उज्ज्वल

Kharif Crop Demonstration: खरीप हंगामासाठी पीक प्रात्यक्षिकांसह बियाणे देणार

SCROLL FOR NEXT