Moong Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Sowing : खानदेशात उन्हाळ मूग पेरणीस पसंती

Summer Moong : खरिपात मुगाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. यामुळे यंदा मुगाचे दर स्थिर होते.

Team Agrowon

Jalgaon News : खरिपात मुगाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. यामुळे यंदा मुगाचे दर स्थिर होते. त्यात यंदा विविध यंत्रणा, संस्थांनी उन्हाळ मूग पेरणीसंबंधी अभियान सुरू केले. त्यास प्रतिसाद मिळत असून, मूग पेरणी ५०० हेक्टरवर जाईल, असे संकेत आहेत.

उन्हाळ मुगाचे उत्पादन कमी येते, त्यासाठी चांगले वाण नाहीत, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये होती. ही बाब लक्षात घेता मुगाचे दर्जेदार वाण, चांगले उत्पादन उन्हाळ हंगामात देणारे वाणही बाजारात आले असून, त्यांची मागणी आहे. मुगाचे उत्पादन खरिपात कमी पाऊस व इतर समस्यांमुळे आलेच नाही.

मुगाचा तुटवडा बाजारात अद्यापही आहे. त्याचे दर आठ ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल, असे होते. काही शेतकऱ्यांनी कृत्रीम जलसाठ्यांच्या मदतीने मुगाचे उत्पादन खरिपात घेतले होते. त्याचे उत्पादन एकरी एक ते सव्वा क्विंटल आले, परंतु त्यास दर ११ हजार रुपयांवर मिळाले. अद्यापही दर टिकून आहेत. त्यात उन्हाळ सोयाबीनप्रमाणे उन्हाळ मूग पेरणीसंबंधी काही संस्थांनी आवाहन केले.

काळ्या कसदार जमिनीत पेरणी

उन्हाळ मुगाची पेरणी काळ्या कसदार जमिनीत केली जात आहे. ही जमीन मुगासाठी चांगली मानली जाते. कारण पुढे उष्णता वाढल्यानंतर काळ्या कसदार जमिनीत पाण्याची गरज हलक्या जमिनीपेक्षा कमी असणार आहे.

यामुळे शेतकरी चांगल्या जमिनीत पेरणी करीत असून, कापसाखाली रिकामे झालेले क्षेत्र, केळीची काढणी पूर्ण झालेल्या बागांत लागवड केली जात आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यात उन्हाळ मुगाची पेरणी अधिक होईल, असे दिसत आहे.

पेरणी मागील आठवड्यातच सुरू झाली आहे. ही पेरणी या आठवड्यातही सुरू राहील. त्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात उन्हाळ मूग पेरणी होईल, असेही संकेत आहेत.

अनेक शेतकरी मूग घेतल्यानंतर त्यात पपई, केळी लागवडीचे नियोजन करीत आहेत. बेवडसाठी देखील मूग पीक चांगले मानले जाते. पीक घेतल्यानंतर मुगाचे अवशेष जमिनीत गाडून त्यात लागवड केली जाईल.

केळीखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात ठिबकच्या माध्यमातून सिंचन केले जात आहे. तर अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या मदतीने पेरणी करीत आहेत. यंदा पेरणी दुप्पट होईल, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT