Summer Mung  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Mung Cultivation : उन्हाळी मूग लागवड तंत्र, सुधारित वाण

Summer Mung : उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम मानल जात. या काळात मुगाच चांगल उत्पादन मिळू शकत. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते.

Team Agrowon

Summer Crop : उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम मानल जात. या काळात मुगाच चांगल उत्पादन मिळू शकत. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते. मूग पीक साधारण ६० ते ६५ दिवसांत तयार होत. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील मुगाला फटका बसला त्यामुळे खरीप मूग उत्पादनात घट झाली.  त्यामुळे तुमच्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तर उन्हाळी मुग लागवडीचा नक्की विचार करा. 

पेरणी 

मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.  पेरणी फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवडा या काळात करावी. पेरणी करताना दोन ओळीत ३० सेंटीमीटर आणि दोन रोपात १० सेंटीमीटर अंतर ठेवाव. या पद्धतीने पेरणी केल्यास एकरी ५ ते ६ किलो बियाण पुरेस होत.

पेरणीसाठी घरच बियाण वापरत असाल तर दर ३ वर्षांनी त्यात बदल करा. मूग पिकाला साधारणपणे ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या लागतात. यामध्ये पेरणीनंतर जमिनीनूसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देण्याच नियोजन कराव. महत्वाच म्हणजे फुले येताना आणि शेंगा भरताना पाणी कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. 

सुधारित वाण 

मुगाच चांगल उत्पादन मिळवायच असेल तर सुधारित वाणाची निवड करण अत्यंत गरजेच आहे. 

मुगाचे अनेक सुधारित वाण आहेत. त्यापैकी फुले चेतक हे ६५ ते ७० दिवसात तयार होणारे वाण आहे. हे वाण जास्त उत्पादन देणारे असून भुरी रोगाला प्रतिकारक आहे.  या वणाचे हेक्टरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.  

मुगाचे फुले एम-२ हे वाण ६० ते ६५ दिवसात तयार होणारे वाण आहे. हे वाण खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आले आहे. या वाणापासून हेक्टरी ११ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते.  

मुगाचे तिसरे वाण आहे विराट. हे वाण उन्हाळी हंगामासाठी उत्तम मानल जात.  कारण हे वाण ५२ ते ५६ एवढ्या कमी दिवसात तयार होत. याशिवाय हे वाण पिवळा विषाणूसाठी प्रतिकारक आहे. या वाणापासून हेक्टरी १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत. 

याशिवाय उशीरा पेरणीसाठी फुले सुवर्ण या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. हे वाण भुरी, पिवळा मोझॅक या रोगाला प्रतिकारक आहे. याशिवाय मुगाचे वैभव, पीकेव्ही एकेएम-४, बीपीएमआर १४५, उत्कर्ष, पुसा वैशाखी, बीएम-४, एस-८ आणि कोपरगाव हे ही वाण आहेत.  या पैकी जे वाण उपलब्ध आहे त्या वाणाची पेरणी करा.  

--------

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Biofertilizers: जैविक निविष्ठांच्या विक्रीतून ‘महाबीज’ला २.३९ कोटींचा महसूल

Vidarbh Fuel Shortage: विदर्भात ऐन खरीप हंगामात डिझेल टंचाईचा फटका

Nanded Diesel Shortage: नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत संभ्रम

Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीनमधील तेजी टिकून तूर, मका हरभरा भाववाढीचे संकेत

Solapur Diesel Shortage: पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील मशागतीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT