
सूरज कुलकर्णी, रामप्रसाद गायकवाड, डॉ. विजू अमोलिक
Groundnut Production : खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामातील भुईमुगाची उत्पादकता ही जास्त असते. तरीही त्याच्या उत्पादकता वाढीसाठी टीप्स...
जास्त उत्पादनक्षम, कीड व रोगास कमी बळी पडणाऱ्या सुधारित वाणांची लागवडीसाठी निवड.
प्रमाणित बियाण्यांचा योग्य प्रमाणात वापर.
हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखणे.
बीजप्रक्रिया, खते, जिवाणू संवर्धक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार संतुलित वापर.
तण, रोग व कीड नियंत्रण वेळेत करणे.
योग्य पाणी व्यवस्थापन.
जमीन
समपातळीतील मध्यम ते हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी तसेच वाळू, चुना व सेंद्रिय पदार्थयुक्त जमीन पिकास मानवते. खूप भारी, चिकट व कडक होणाऱ्या जमिनीत शेंगाची वाढ चांगली होत नाही. शेंगा खुडण्याचे प्रमाण वाढते.
हवामान
उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील या पिकासाठी भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान उपयुक्त असते. पिकाच्या कायिक वाढीसाठी २७ ते ३० अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.
पूर्वमशागत
भुईमूग पिकाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असणे आवश्यक आहे.
लागवडीपूर्वी बैलजोडी किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. जास्त खोल नांगरणी टाळावी. .
कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ५ ते ७ टन या प्रमाणात द्यावे.
पेरणीची वेळ
उन्हाळी हंगामात पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या वेळेत करावी. जसजसा उशीर होईल तशी उत्पादनात घट येते. काही ठिकाणी डिसेंबरपासून पेरणी केली जाते. मात्र थंडीची तीव्रता जास्त राहिल्यास बियाण्यांच्या उगवण शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यानंतर पेरणी करावी.
बीजप्रक्रिया
बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षणासाठी प्रति किलो बियाण्यांस, थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबिअम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रमाणे प्रति किलो बियाण्यांस चोळावे. बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरावे.
लागवड
दोन ओळींत ३० सेंमी व दोन रोपांत १० सेंमी इतके अंतर ठेवून पेरणी करावी. जेणेकरून हेक्टरी रोपांची संख्या ३.३३ लाख इतकी राखता येईल.
टोकण पद्धतीने योग्य अंतरावर पेरणी केल्यास २५ टक्के बियाणे कमी लागते.
बियाणे २ ते ५ सेंमी खोल पेरावे. जास्त खोल पेरणी करू नये.
खत व्यवस्थापन
माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे. चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १० टन प्रमाणे कुळवाच्या साह्याने पेरणीपूर्वी जमिनीत चांगले मिसळावे.
हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद द्यावे. (युरिया ५४ किलो, एसएसपी ३१२.५ किलो)
भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रेसोबत जिप्सम हेक्टरी ४०० किलो (पेरणीवेळी २०० किलो, तर उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना) जमिनीत मिसळून द्यावे.
ठिबक सिंचन पद्धतीने विद्राव्य खते ९ समान हप्त्यात विभागून द्यावीत. (२५:५०:००)
आंतरमशागत
पेरणीनंतर नांग्या आढळल्यास ताबडतोब बी टोकून घ्यावे. पीक साधारणपणे ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे.
साधारणपणे १४ ते २० दिवसांच्या अंतराने २ खुरपण्या व १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन कोळपण्या कराव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते.
आऱ्या सुटू लागल्यानंतर (३५ ते ४० दिवस) कोणतीही आंतर मशागतीची कामे करू नयेत. फक्त मोठे तण उपटून टाकावे. म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल.
पाणी व्यवस्थापन
उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें. मी. पाण्याची आवश्यकता भासते.
पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी एक पाणी (आंबवणी) द्यावे, म्हणजे राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये,
तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होत असल्याने भुईमुगासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
पाणी व्यवस्थापनातील महत्त्वाचे
भुईमुगास लागलेल्या एकूण फुलांपैकी फक्त ५ ते २० टक्केच फुलांचे रूपांतर शेंगामध्ये होते. एकूण लागलेल्या शेंगापैकी ६६ टक्के शेंगा परिपक्व होतात,
उपटा वाण. दाण्याचा रंग लाल. तेलाचे प्रमाण ५२ टक्के. स्पोडोप्टेरा अळी, तांबेरा, पानांवरील ठिपके, खोडकुज रोगास मध्यम प्रतिकारक. गडद हिरव्या पानामुळे ताणास सहनशील. संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.
उपटा वाण. पाण्याच्या ताणास सहनशील. तेलाचे प्रमाण ४८.२२ टक्के. संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.
उपटा वाण. तेलाचे प्रमाण ४९ टक्के. ॲफ्लाटॉक्सिन दूषितीकरणासाठी सहनशील. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी प्रसारित.
उपटा वाण, संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.
उपटा वाण. १५ दिवसांची सुप्त अवस्था, संपूर्ण महाराष्ट्रासाठी.
उपटा वाण. उत्तर महाराष्ट्रासाठी प्रसारित.
उपट्या, मूळकुज रोगास सहनशील. तेलाचे प्रमाण ४९ ते ५० टक्के, प. महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांकरिता.
उपट्या, जाड दाणे, तेलाचे प्रमाण ४८ टक्के. दाण्याचा रंग गुलाबी लाल. अफलाटॉक्सिन दूषितीकरणसाठी उच्च सहनशील, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांकरिता.
उपटा वाण. खोडकुज, पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक. मध्यम टपोरे दाणे. तेलाचे प्रमाण ५१.६ टक्के, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू राज्यासाठी शिफारस.
उपट्या, टपोरे दाणे, निर्यातक्षम वाण, तेलाचे प्रमाण ५१ टक्के.
उपट्या, लवकर तयार होणारा, पाण्याचा ताण सहन करणारा.
उर्वरित ३३ टक्के शेंगा अपरिपक्व अवस्थेत असतात.
जास्तीत जास्त परिपक्व शेंगा एकदाच मिळविण्यासाठी झाडास लागणारे पहिले फूल व शेवटचे फूल हा कालावधी कमी असणे गरजेचे असते. त्यासाठी पाणी व्यवस्थापनास अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडास पहिले फूल दिसताच पिकास पाण्याचा हलका ताण द्यावा. या काळात ५ ते ६ दिवस पिकास पाणी देऊ नये. या पाण्याच्या ताणामुळे पिकाची अवास्तव वाढ रोखली जाते. त्यामुळे जास्त फुले एकाच वेळी निर्माण होतात.
पर्यायाने एकाच वेळी आलेल्या फुलांच्या आऱ्या एकाच वेळी जमिनीत शिरतात. त्यापासून निर्माण झालेल्या शेंगा एकाच कालावधीत परिपक्व होऊन सारख्याच आकाराच्या असतात.
पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी पिकास आऱ्या सुटण्याच्या वेळेस जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास जमिनीतील कॅल्शिअमचे शोषण करतात, यामुळे शेंगाची वाढ चांगली होते.
पिकास पाण्याचा वापर अति झाल्यास वनस्पतीची शाकीय वाढ जास्त होते. शेंगा कमी प्रमाणात लागतात.
वाण निवड
बियाण्यांचे प्रमाण ठरविताना पेरणीकरिता निवडलेला वाण, हेक्टरी रोपांची संख्या, १०० बियाणे दाण्यांचे वजन, उगवणक्षमता व पेरणी अंतर इत्यादी बाबींचा विचार करावा.
पेरणीकरिता हेक्टरी साधारणपणे १०० ते १२५ किलो बियाणे लागते.
बियाणे प्रमाण (किलो प्रति हेक्टर)
फुले उन्नती, एस.बी. ११ टीएजी २४ व टीजी २६ ः १०० किलो.
टीपीजी ४१, जेएल ७७६, जेएल ५०१ ः १२० ते १२५ किलो ः ८० ते ८५ किलो.
वाण कालावधी (दिवस) सरासरी उत्पादन (क्विं/हे.) वैशिष्ट्ये
फुले उन्नती १२० ते १२५ ३० ते ३५ उपटा वाण. दाण्याचा रंग लाल. तेलाचे प्रमाण ५२ टक्के. स्पोडोप्टेरा अळी, तांबेरा, पानांवरील ठिपके, खोडकुज रोगास मध्यम प्रतिकारक. गडद हिरव्या पानामुळे ताणास सहनशील. संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.
एस.बी. ११ ११५ ते १२० १५ ते २० उपटा वाण. पाण्याच्या ताणास सहनशील. तेलाचे प्रमाण ४८.२२ टक्के. संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.
जे. एल. ५०१ ११० ते ११५ ३० ते ३२ उपटा वाण. तेलाचे प्रमाण ४९ टक्के. ॲफ्लाटॉक्सिन दूषितीकरणासाठी सहनशील. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी प्रसारित.
टी.ए.जी. २४ ११० ते ११५ २५ ते ३० उपटा वाण, संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.
टी. जी. २६ ११० ते ११५ २५ ते ३० उपटा वाण. १५ दिवसांची सुप्त अवस्था, संपूर्ण महाराष्ट्रासाठी.
जे. एल. ७७६ (फुले भारती) ११५ ते १२० ३० ते ३५ उपटा वाण. उत्तर महाराष्ट्रासाठी प्रसारित.
जे. एल. २८६ (फुले उनप) ९० ते ९५ २० ते २५ उपट्या, मूळकुज रोगास सहनशील. तेलाचे प्रमाण ४९ ते ५० टक्के, प. महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांकरिता.
टी. पी. जी. ४१ १२५ ते १३० २५ ते ३० उपट्या, जाड दाणे, तेलाचे प्रमाण ४८ टक्के. दाण्याचा रंग गुलाबी लाल. अफलाटॉक्सिन दूषितीकरणसाठी उच्च सहनशील, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांकरिता.
केडीजी- १६० (फुले चैतन्य) १०५ ते ११० २० ते २४ उपटा वाण. खोडकुज, पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक. मध्यम टपोरे दाणे. तेलाचे प्रमाण ५१.६ टक्के, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू राज्यासाठी शिफारस.
टीएलजी-४५ ११५ ते १२० २० ते २५ उपट्या, टपोरे दाणे, निर्यातक्षम वाण, तेलाचे प्रमाण ५१ टक्के.
एलजीएन-१ १०५ ते ११० १८ ते २० उपट्या, लवकर तयार होणारा, पाण्याचा ताण सहन करणारा.
पाणी पाळीसाठी महत्त्वाच्या अवस्था
पिकाची अवस्था पेरणीनंतर पाण्याच्या पाळ्या (दिवस)
उगवणीच्या वेळी पेरणीनंतर लगेच
फुलोरा येणे ३० ते ४० दिवस
आऱ्या सोडणे. ४० ते ४५ दिवस
शेंगा धरणे व दाणे भरणे ६५ ते ७० दिवस
- सूरज कुलकर्णी, ९४०४२४७९५१
(पीएचडी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.