Summer Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : सरासरीच्या ४० टक्के क्षेत्रावरच उन्हाळी पिके

Summer Crop : राज्यात उन्हाळी पिकांचे सरासरी ३ लाख ५९ हजार ७५९ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ३८ हजार ४२० हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ४० टक्के पेरणी झाली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राज्यात उन्हाळी पिकांचे सरासरी ३ लाख ५९ हजार ७५९ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ३८ हजार ४२० हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ४० टक्के पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक ८३ हजार ९१ हेक्टर उन्हाळी भाताचे क्षेत्र आहे. दरवर्षीचे आणि यंदाचे उन्हाळी पिकांचे क्षेत्र पाहता दुष्काळी परिस्थितीचा त्यावर परिणाम झाल्याची स्थिती आहे.

यंदा आतापर्यंत उन्हाळी भात लागवड (Rice Cultivation) सरासरीच्या जवळ आली आहे. गेल्या वर्षी भाताची १ लाख ४७ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा सरासरीच्या तुलनेत मक्याची १९ टक्के, उन्हाळी ज्वारीची ३६ टक्के, बाजरीची ४२ टक्के पेरणी झाली आहे. उन्हाळी मूग, उडदासह सोयाबीनचीही पेरणी फारशी झालेली नाही.

उन्हाळी भुईमुगाचे सुमारे ९० हजार ६०५ सरासरी क्षेत्र असून, गेल्या वर्षी ८९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा त्या तुलनेत २९ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनचे २३ हजार ३५५ सरासरी हेक्टर क्षेत्र असून २५ ते २६ हजार हेक्टरवर दरवर्षी पेरणी होत असते. यंदा ती केवळ २ टक्के झाली आहे.

मागील तीन वर्षांतील उन्हाळी पेरणीचे एकूण क्षेत्र पाहता साडेतीन लाख ते चार लाख हेक्टरपर्यंत पेरणी होत असते. साधारणपणे २० मार्चपर्यंत उन्हाळी पिकांची पेरणी असते. अद्याप पंधरा दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे क्षेत्रात आणखी थोडाफार वाढ होणार असली, तरी यंदा पाणीटंचाईचे सावट गडद आहे. त्याचा परिणाम या क्षेत्रावर दिसण्याची चिन्हे आहेत.

आतापर्यंत सर्वाधिक गोंदिया जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर ११४ टक्के पेरणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात १०३ टक्के, नगर जिल्ह्यात ४० टक्के, अमरावती जिल्ह्यात ५७ टक्के, वर्धा जिल्ह्यात ७१ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८२ टक्के पेरणी झाली आहे.

पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)

- भात ः ८१ हजार ५६०

- मका ः ११ जार ०६४

- ज्वारी ः ४ हजार ५०५

- बाजरी ः ८ हजार ९७६

- मूग ः २ हजार ०३७

- उडीद ः २७७

- भुईमूग ः २५ हजार ९८३

- सूर्यफूल ः २२६

- तीळ ः २ हजार ४४८

- सोयाबीन ः ९५९

चारापिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

राज्यातील बहुतांश भागात या वर्षी पाणीटंचाई (Water Scarcity) आहे. खरीप व रब्बीची पिके पूर्ण क्षमतेने न आल्यामुळेही चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे या वर्षी पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकऱ्यांनी चारा पिके घेण्यास प्राधान्य दिले आहे. एकट्या नगर जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

Farmers Protest: ऊस बिलासाठी म्हेत्रेंच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगरला ३८ महिलांना मिळणार जिल्हा परिषदेत संधी

Solapur Zilla Parishad: विजय डोंगरे, उमेश पाटलांना संधी, साठेंची अडचण वाढली

Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज 

SCROLL FOR NEXT