Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Sugarcane Crushing : संघटनांच्या आंदोलनाचा अडथळा आला नाही तर दोन्ही राज्यांच्या तोडी एकदम सुरू होतील. त्यामुळे पळवापळवीवर निर्बंध येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Karnataka Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान मागची काही वर्षे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने सीमाभागातील बराच ऊस गाळप कर्नाटकातील साखर कारखाने करायचे परंतु यंदा अशी परिस्थिती ओढावणार नाही असे चित्र आहे.

कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास ५० किमीवरून उसाची पळवापळवी करतात, ऊस गाळप हंगामाच्या सुरूवातीला पश्चिम महाराष्ट्रात जर शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आणि कारखान्यांच्या तोडी बंद पाडल्या की, कर्नाटकचे साखर कारखाने महाराष्ट्रातील ऊस तोडायला सुरुवात करतात. सीमेवरच्या गावांचा बहुतांशी ऊस दोन्ही राज्यांतील कारखान्यांमध्ये विभागला जातो. यंदा मात्र संघटनांच्या आंदोलनाचा अडथळा आला नाही तर दोन्ही राज्यांच्या तोडी एकदम सुरू होतील. त्यामुळे पळवापळवीवर निर्बंध येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मागच्या वर्षी तब्बल महिनाभर उसाचा हंगाम लांबला होता. यंदा एवढा कालावधी जाऊ नये, यासाठी कोल्हापूर, सांगली ऊस हंगाम वेळेत सुरू होण्याची अपेक्षा ऊस उत्पादक व साखर उद्योगातूनही होत आहे.

हंगामाची तारीख निश्चित झाली असली तरी अद्याप कोणत्याही संघटनेने यंदाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. १५ नोव्हेंबरला कारखाने व्यवस्थितपणे सुरू झाल्‍यास मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ऊस हंगाम चालेल; पण हंगाम सुरू होण्यास अवधी लागल्‍यास उन्हाळ्यात ऊस तोड करणे अडचणीचे ठरणार आहे.

गाळप हंगामाचे दिवस वाढून शेतकऱ्यांचे पुढील पिकांचे नियेाजन बिघडण्याची शक्यता आहे. उसाच्या पिकावर परिणाम होऊन वजनात व उताऱ्यात घटही होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्राचा गाळप हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर ऊस तेाडणी यंत्रणा तिकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या खावटी व जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण होत असल्याचा यापूर्वीचा अनुभव असल्याने यंदा हंगाम सुरू होण्यास आडकाठी येऊ नये, अशी अपेक्षा साखर उद्योगाची आहे.

कोल्हापूर विभागाची स्‍थिती

जिल्ह्यातील एकूण २३ कारखान्यांकडे १ लाख ८७ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. त्यातून १ कोटी ४० हजार टन ऊस उपलब्ध होणार आहे. सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांकडे १ कोटी ३७ लाख हेक्टर ऊस नोंद झाली आहे. त्यातून १ कोटी २५ लाख टन ऊस उपलब्ध होऊ शकतो.

कोल्हापुरातील २३ कारखान्यांची प्रति दिन गाळप क्षमता १ लाख ३७ हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांची प्रति दिन गाळप क्षमता ८८ हजार टन इतकी आहे. म्हणजे कोल्हापूर विभागात एकूण तोडणीचा ऊस २ कोटी ५५ लाख टन इतका आहे. विभागाची गाळप क्षमता २ लाख २५ हजार टन प्रति दिन इतकी आहे. म्हणजे या विभागातील गाळप हंगाम १२० ते १२५ दिवस इतका चालण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT