Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing Season : मराठवाड्यासह खानदेशातील चौदा कारखान्यांचे गाळप आटोपले

Sugarcane Season 2025 : मराठवाड्यासह खानदेशातील मिळून पाच जिल्ह्यांतील १४ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. तर आठ कारखान्यांचे ऊस गाळप मंगळवारपर्यंत (ता. ११) सुरूच होते.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यासह खानदेशातील मिळून पाच जिल्ह्यांतील १४ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. तर आठ कारखान्यांचे ऊस गाळप मंगळवारपर्यंत (ता. ११) सुरूच होते. मजुरांबरोबरच हार्वेस्टरच्या साह्याने ऊस काढणी झाल्याने झपाट्याने कारखान्यांचे गाळप आटोपत असल्याची स्थिती आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांत यंदा २२ कारखान्यांनी आतापर्यंत ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. त्यामध्ये १३ सहकारी तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

ऊस गाळप हंगाम आटोपलेल्या कारखान्यांमध्ये नंदुरबारमधील दोन जळगावमधील एक छत्रपती संभाजीनगरमधील पाच बीडमधील सहा कारखान्यांचा समावेश आहे. सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये जालन्यातील चार, बीडमधील दोन व छत्रपती संभाजीनगरमधील दोन कारखान्यांचा समावेश आहे.

गाळपाची गती पाहता लवकरच इतरही कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपण्याची चिन्हे आहेत. शिवाय गाळपासाठी उपलब्ध असलेला ऊस व साखरेचा उतारा लक्षात घेता साखरेचे अपेक्षित उत्पादन होण्याची शक्यता नाही.

८० लाख टन उसाचे गाळप

साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांचे ऊस गाळप सुरू झाले होते. सर्व बावीस कारखान्यांनी मंगळवारपर्यंत (ता. ११) ७९ लाख ९८ हजार ९० टन उसाचे गाळप करत सरासरी ७.९८ टक्के साखर उताऱ्याने ६३ लाख ८४ हजार ९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जिल्हा नंदुरबार

कारखाने २

ऊस गाळप ७८८१२० टन

साखर उत्पादन ५००९०० क्विंटल

साखर उतारा ६.३६ टक्के

जिल्हा जळगाव

कारखाने १

ऊस गाळप १०४३२९ टन

साखर उत्पादन १०५०५० क्विंटल

साखर उतारा १०.०७

जिल्हा छत्रपती संभाजी नगर

कारखाने ७

ऊस गाळप १८३२४७७ टन

साखर उत्पादन १८५६२८९ क्विंटल

साखर उतारा १०.१३ टक्के

जिल्हा जालना

कारखाने ४

ऊस गाळप २०९७३८६ टन

साखर उत्पादन १७६०१४० क्विंटल

साखर उतारा ८.३९ टक्के

जिल्हा बीड

कारखाने ८

ऊस गाळप ३१७५७७९ टन

साखर उत्पादन २१६१७१६ क्विंटल

साखर उतारा ६.८१ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

Cashew Truck Seized : कर चुकवून निघालेले काजूचे ट्रक ताब्यात

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात ९१ मिमी पाऊस

SCROLL FOR NEXT