Sugarcane Crushing Season : खानदेशात एप्रिलअखेरपर्यंत चालणार ऊस गाळप

Sugarcane Season 2025 : खानदेशात यंदा ऊग गाळप उशिराने सुरू झाले. अद्याप २० ते २२ टक्के ऊस तोडणीविना किंवा गाळपाच्या प्रतीक्षेत आहे.
Sugar Factory
Sugarcane Season Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदा ऊग गाळप उशिराने सुरू झाले. अद्याप २० ते २२ टक्के ऊस तोडणीविना किंवा गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची तोडणी गतीने सुरू आहे. परंतु गाळपाची गती लक्षात घेता यंदाही गाळप एप्रिलपर्यंत सुरू राहील, असे दिसत आहे.

आणखी किमान तीन ते चार लाख टन उसाची तोडणी होणार आहे. त्याचे गाळप झाल्यानंतर साखरेचे अधिकचे उत्पादनही खानदेशात दिसणार आहे. खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. यात सर्वाधिक सुमारे १४ हजार हेक्टरवर नंदुरबार जिल्ह्यात ऊस पीक आहे. जळगाव जिल्ह्यातही सुमारे १३ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. धुळ्यातही सुमारे पाच हजार हेक्टरवर ऊस आहे. यातील २८ ते ३० टक्के उसाची तोडणी गाळप झाले आहे.

Sugar Factory
Sugarcane Season : ऊसतोड मजुरांना परतीचे वेध

सुमारे १८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. नंदुरबारमध्ये तीन कारखाने सुरू आहेत. यात समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप केले आहे. पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा कारखान्यानेही गाळपातील गती कायम राखली आहे. डोकारे (ता. नवापूर) येथील कारखान्याचे गाळपही सुमारे दीड लाख टन एवढे झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात दोनच कारखाने सुरू आहेत. यात मुक्ताईनगर येथील कारखान्याचे गाळप सुरू आहे. चहार्डी (ता. चोपडा) येथे कारखाना सुरू झाला असून, या कारखान्याचे गाळपही वेगात सुरू आहे. भोरस (ता. चाळीसगाव) येथील कारखान्याचे गाळप यंदा सुरू झालेले नसल्याची माहिती आहे. खानदेशात अद्याप अनेक भागांत ऊस उभा आहे.

Sugar Factory
Sugarcane Crushing Season : नांदेड विभागातील दहा कारखान्यांचा पट्टा पडला

त्याची तोडणी सर्वच कारखाने आपल्य स्तरावर यंत्रणा राबवून करीत आहेत. ढगाळ, उष्ण वातावरण व सणवार यात तोडणी रखडत होत आहे. यामुळे तोडणी एप्रिल अखेरपर्यंत खानदेशात सुरू राहील. आणखी किमान २५ ते २८ लाख टन उसाची तोडणी पुढे होईल.

उसाला फुटताहेत तुरे

खानदेशात कमाल कारखाने खासगी व्यवस्थापनाचे आहेत. चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यातून ऊस तोडणीबाबत शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. चोपडा तालुक्यात गरताड व इतर भागात ऊस तोडणी कारखाना विलंबाने करीत असल्याची तक्रार होती.

तोडणीला विलंब होत असल्याने उसाला तुरे फुटत आहेत. त्याचे वजन कमी होईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. यातच उसाला आग लागल्याच्या घटनाही घडतात. यामुळे उष्णता आणखी वाढण्यापूर्वीच तोडणीला गती दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com