Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

Sugarcane Season 2025 : यंदाचा गाळप हंगाम साडे तीन ते चार महिन्यांत आटोपला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ५ लाख क्विंटलने घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sugar Factory
Sugarcane SeasoonAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील यंदाचा पंधरा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून दोन साखर कारखान्यांची धुराडी या आठवड्यापर्यंत बंद होतील. १७ साखर कारखान्यांनी ७६ लाख ६३ हजार टन उसाचे गाळप करत ८० लाख ६६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

यंदाचा गाळप हंगाम साडे तीन ते चार महिन्यांत आटोपला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ५ लाख क्विंटलने घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामात १० सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. यंदाचा हंगाम नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू झाला.

Sugar Factory
Sugarcane Crushing Season : मराठवाड्यासह खानदेशच्या पाच जिल्ह्यातील १० कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला

१७ साखर कारखान्यांनी ७६ लाख ६३ हजार ४०८ टन उसाचे गाळप केले असून ८० लाख ६६ हजार ०८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा १०.५३ टक्के इतका आहे. क्रांती साखर कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप करत साखर उत्पादनात अग्रेसर ठरला आहे. हुतात्मा कारखाना उताऱ्यात पुढे आहे.

Sugar Factory
Sugarcane Crushing Season : खानदेशात एप्रिलअखेरपर्यंत चालणार ऊस गाळप

गतवर्षीही सतरा साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. ८७ लाख ११ हजार ४०८ टन उसाचे गाळप करत ९७ लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. गत वर्षी पावसाच्या दडीमुळे लागवड लांबणीवर पडली होती. त्यानंतर जून ते ऑक्टोबर या दरम्यान अतिवृष्टी, परतीचा पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही.

याचा फटका साखरेच्या उत्पादनावर झाला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या गाळप हंगामात अंदाजे ५ लाख क्विंटलने उत्पादन कमी होईल, अशी शक्यता आहे.

साखर कारखाना गाळप (टन) उत्पादन (क्विटल) उतारा (टक्के)

श्री दत्त इंडिया ८२४८५५ ८५१५१० १०.३४

राजारामबापू युनिट १ ६६७४६५ ७७९२०० ११.७७

विश्‍वास चिखली ४४३०१६ ५३२७३० १२.०१

हुतात्मा वाळवा ४७०८५० ५२३४७५ १२.८५

राजारामबापू युनिट २ ३९८५९३ ५०७६०० १२.५

एसईझेड तूरची ४१३२० २२८४० ७.४८

राजारामबापू युनिट ४ २०५३६५ २२६७०० १०.३३

सोनहिरा, वांगी ९५६३१० ८७६०६० ९.१२

क्रांती अग्रणी, कुंडल ९७२६६० १०६११२० १२.१४

राजारामबापू युनिट-३ २९७८०० ३६१७४० १२.२९

मोहनराव शिंदे, आरग ३१७९८५ ३४५५०० १०.९२

दालमिया, कोकरूड ४५३५७४ ५५९४३० १२.२

यशवंत शुगर नागेवाडी १६८२१० १९३४५० ११.३३

रायगाव शुगर १४०६३० १४३१०० १०.७८

उदगिरी, खानापूर ४९४८४१ ३५९७०० ७.१७

सदगुरू श्रीश्री ४८९१४४ ३६४२५५ ७.३७

श्रीपती शुगर, डफळापूर ३२०७९० ३५७६७० ११.२४

एकूण ७६६३४०८ ८०६६०८० १०.५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com