Sugarcane Price agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Price : बेळगाव जिल्ह्यात ऊसदर कमी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Belgaum Farmers : महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Sugarcane Rate : महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अती पावसाने झालेली उत्पादनातील घट तसेच साखर कारखान्यांनी जाहीर केलेला कमी दर यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गतवर्षी २.८ लाख हेक्टर वरून लागवड क्षेत्रात ३ लाख हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. परंतु गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने उसाची गुणवत्ता आणि उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने गाळप होत नाही. यामुळे कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने शिरोळ, हातकणंगले, चंदगड, यासह सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांतील उसाची पळवापळवी करत आहेत. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारांच्या मूळ सभासदांचा ऊस मागे राहत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे.

कर्नाटकातील १६ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या ७६ साखर कारखान्यांपैकी २९ साखर कारखाने बेळगाव जिल्ह्यात आहेत. राज्यातील इतर प्रमुख साखर उत्पादक जिल्हे म्हणजे बागलकोट (१३), विजयपुरा (९), मंड्या (५), बिदर (५), कलबुर्गी (४) आणि हावेरी (२) असे आहेत.

कर्जाचा बोजा, नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात झालेला जोरदार पाऊस, कामगारांची कमतरता आणि ऊस वाळण्याची भिती यंदाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. याशिवाय महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांचा फटका कर्नाटकातील साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनाही बसला आहे.

कर्नाटक राज्यातील १६ जिल्ह्यांतील साखर कारखाने दरवर्षी ५८ लाख ६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करतात. दरम्यान महाराष्ट्रातून सुमारे १ हजार ३०० टोळ्या कर्नाटकात दरवर्षी येत असतात. परंतु सध्या निवडणुकीमुळे ऊस तोडणीसाठी मजूरचं कर्नाटक सीमा भागात लवकर आले नसल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची भीती ऊस उत्पादकांना आहे.

बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे मालकांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने संबंधित क्षेत्रानुसार सरासरी २ हजार ८५० ते ३ हजार ५०० रुपये प्रति टन दर निश्चित केली आहे. साखर कारखानदार काढणीचा खर्च कमी करत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन उसाला केवळ २ हजार ६५० ते २ हजार ९०० रुपये मिळत आहेत. यामुळे ऊस उत्पादकांच्या पदरात कमी दर पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT