Kolhapur Voting Percentage : कोल्हापूर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. या निवडणुकीत उच्चांकी सुमारे ७६.१७ टक्के इतके मतदान झाले. त्यामुळे कोल्हापूर राज्यात भारी ठरले आहे. याचबरोबर राज्यात विधानसभा मदतारसंघामध्ये उच्चांकी मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ८४.९५ टक्के मतदान झाले. गेल्या तीन निवडणुका पाहिल्यास ही टक्केवारी वाढतच आहे.
यंदाही वाढत्या टक्केवारीची परंपरा कायम ठेवत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला आहे. २००९ मध्ये ७३.९१ टक्के, २०१४ मध्ये ७५ टक्के, २०१९ मध्ये ७४.०८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकांमध्ये करवीर मतदारसंघाने ही राज्यात बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात चुरशीने सुमारे ७६.१७ टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाकडून मतदार नोंदणी व मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याचबरोबर मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करूनही स्वत:हून मतदानासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीत वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
२००९ मध्ये जिल्ह्यातील एकूण २६ लाख ५१ हजार १३७ मतदारांपैकी १९ लाख ५९ हजार ४७५ जणांनी मतदान केले होते. १२ लाख ३३ हजार ९६५ पुरुष मतदारांपैकी १० लाख १७ हजार ६१८ जणांनी मतदान केले. १३ लाख ४५ हजार स्त्री मतदारांपैकी ९ लाख ४१ हजार ८५७ जणींनी मतदानाचा हक्क बजावला होता.
२०१४ मध्ये जिल्ह्यातील एकूण २९ लाख १७ हजार ९१७ मतदानापैकी २१ लाख ७६ हजार ८८ असे एकूण ७४.५१ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये एकूण १५ लाख ८५ हजार ३८६ पुरुष मतदारांपैकी ११ लाख ९४ हजार ५६३ जणांनी मतदान केले होते. १५ लाख ७ हजार ५७६ महिला मतदारांपैकी १० लाख ९६ हजार ६२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर एकूण ८१ इतर मतदारांपैकी २१ जणांनी मतदान केले. यंदाच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी ७६.१७ टक्के इतके मतदान झाले.
राज्यात ‘करवीर’मध्ये सर्वाधिक मतदान
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतही करवीर मतदारसंघ अव्वल ठरला होता. यावेळी हाच मतदारसंघ राज्यात अव्वल ठरला. जिल्ह्यातही करवीरमध्ये सर्वाधिक ८४.९४ टक्के मतदान झाले. सर्वाधिकची परंपरा या मतदारसंघाने कायम ठेवली आहे. २०१४ च्या निवडणुकीत ८४.१९ टक्के, २०१९ च्या निवडणुकीत ८३.९३ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत कागल मतदारसंघ दुसऱ्या स्थानावर असून, तेथे ८३ टक्के इतके मतदान झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.