Sugarcane Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : नंदुरबारमध्ये ऊसपीक जोमात, लवकरच तोडणीला सुरुवात होणार

Sugarcane Season : खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड करणारा तालुका म्हणून शहादा तालुका पुढे आला आहे. नंदुरबारमध्ये सुमारे १४ हजार हेक्टरवर ऊसपीक आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Nandurbar News : खानदेशात ऊस पिकाची लागवडही बऱ्यापैकी आहे. पीकस्थिती बरी आहे. नंदुरबारमध्ये सर्वाधिक ऊसपीक असून, पिकात मध्यंतरी पांढरी माशी व अन्य किडींची समस्या होती. त्यावर शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळविले. पीक पक्व होत असून, लवकरच किंवा पुढील २५ ते ३० दिवसांत तोडणीस सुरुवात होईल, असे संकेत आहेत.

नंदुरबारमधील तळोदा व शहादा तालुक्यांत पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड केली आहे. शहादा तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे.

खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड करणारा तालुका म्हणून शहादा तालुका पुढे आला आहे. नंदुरबारमध्ये सुमारे १४ हजार हेक्टरवर ऊसपीक आहे. शहादा तालुक्यात मध्यंतरी ऊसपीक क्षेत्र चार ते सहा हजार हेक्टरदरम्यान होते.

शेतीमालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल दर, मजूरटंचाई यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. खानदेशात तळोदा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, चाळीसगाव, यावल आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या सहाय्याने उसाची शेती केली जाते.

केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून मजुरांची सातत्याने होणारी टंचाई तसेच मजुरीचे दर वाढल्याने उत्पादित मालाला लागणारा खर्चही वाढला आहे; परंतु त्या मानाने अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे.

यात उसाला काहीअंशी मजुरी कमी लागते, तसेच कीटकनाशकांची फवारणीही नसल्याने अधिकाधिक शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे ते शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. परिसरात चार कारखाने आहेत. त्यामुळेही लागवडीला बळ मिळाले आहे.

सुधारित जातीचे ऊस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले होते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे. ऊस तोडणी दिवाळीनंतर किंवा दिवाळीला सुरू होईल. तशी तयारी कारखान्यांनी केली आहे. नंदुरबारात तीन, धुळ्यात एक व जळगावात दोन साखर कारखाने सुरू होतील, असा अंदाज आहे.

जळगावात १३ हजार हेक्टरवर उसाखालील क्षेत्र

जळगावात उसाखालील सुमारे १३ हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तसेच धुळ्यात पाच हजार हेक्टरवर ऊस आहे. धुळ्यातील शिरपूर, साक्री भागांत ऊसपीक आहे. ऊसपीक अतिपावसाने काही भागांत हवे तसे वाढले नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांनी जिद्दीने खत व अन्य बाबींचे व्यवस्थापन करून पीक वाढविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT