Sugarcane Season : हंगाम सुरू करण्यापूर्वी उसाचे दर जाहीर करा

Sugarcane Rate : उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मितीवरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने उठविली आहे.
Sugarcane Season
Sugarcane FactoryAgrowon
Published on
Updated on

Nanded News : उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मितीवरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने उठविली आहे. यातून साखर कारखान्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढेल. यामुळे साखर कारखानदारांनी यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाचे दर जाहीर करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मागील वर्षात नांदेड जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चांगल्या दराचे फक्त शब्द दिले. पण प्रत्यक्षात अत्यंत कमी दर दिले आहेत. तसेच वाहतूक व तोड दर यामधील वाढीमुळे शेतकऱ्यांना एफआरपी कमी बसल्याचे म्हटले आहे.

Sugarcane Season
Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

मागील वर्षीच्या उसाला कमी मिळालेला दर यामुळे नांदेड जिल्ह्यात ऊसदर व पहिली उचल यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

Sugarcane Season
Sugarcane Farming : ऊस शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन

त्यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संघर्षाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी, चालू गळीत हंगामात तुटलेल्या उसाला एकरकमी ३३०० रुपये प्रतिटन पहिली उचल मिळावी, मागील तीन वर्षांचे आरएसएफचे हिशेब विशेष लेखापरीक्षक नेमून तपासण्यात यावेत व निघालेले आरएसएफचे पैसे तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावेत,

प्रत्येक साखर कारखान्याच्या वजन काट्याजवळ शेतकऱ्यांसाठी निर्धारित केलेल्या ऊस दराचा फलक व उसाचे वजन बाहेरील खासगी वजन काट्यावर करून आणता येईल असा फलक लावावा, अशी मागणी करण्यात आली.

स्वाभिमानीचे हरिभाऊ कदम, किशनराव देळूबकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वानखेडे, हदगाव तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर आदी उपस्थित होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com