Satara Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Satara Sugarcane Season : सातारा जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाचा पडला पट्टा, १७ साखर कारखान्यांचे भरघोस उत्पादन

sandeep Shirguppe

Satara Sugarcane Harvesting Season : यंदाच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखान्यांचा गळीत हंगामाचा पट्टा पडला आहे. तब्बल ४ महिन्यांच्या गाळपातून १ कोटी ११ लाख ५५ हजार ९९० मेट्रीक टन उसाचे गाळप करून १ कोटी ९ लाख ७६ हजार १९८ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील सर्व १७ साखर कारखान्यांचे गाळप आटोपले आहे.

यामध्ये खासगी कारखान्यांनी ५१ लाख ४७ हजार क्विंटल, तर सहकारी साखर कारखान्यांनी ५८ लाख २८ हजार ६१० साखरेची निर्मिती केली आहे. सर्वाधिक १२.४५ टक्के साखर उतारा अजिंक्यतारा साखर कारखान्यांस मिळाला आहे. - गाळपात जरंडेश्वर साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचे गाळप नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. यावेळेस उसाचे प्रमाण कमी असल्याने साखर कारखाने पाच महिने चालले आहेत. पहिल्यांदाच एप्रिलमध्ये साखर कारखाने बंद झाले आहेत. नऊ सहकारी व आठ खासगी कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता. पाणीटंचाई व उसाचे क्षेत्र कमी झाले असतानाही जिल्ह्यात साखर निर्मितीत कारखान्यांनी कोटीची उड्डाणे

कायम ठेवली आहेत. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी एक कोटी ११ लाख ५५ हजार ९९० मेट्रीक टन उसाचे गाळप करून एक कोटी नऊ लाख ७६ हजार १९८ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहेत. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यापासून ऊस क्षेत्र कमी असल्याने गाळप हंगाम लवकरच संपेल व तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यामुळे प्रमुख सर्व कारखान्यांनी कार्यक्षेत्रासह मिळेल

तेथून ऊस आणण्यास प्राधान्य दिले जात होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात गाळप करणाऱ्या संख्येत तीन कारख्यान्यांची भर पडली आहे. ऊस गाळपात व साखर निर्मिती जरंडेश्वर शुगर, तर साखर उताऱ्यात अजिंक्यतारा सहकारी कारखाना अव्वल राहिला आहे. खासगी कारखान्यांनी ५१ लाख ४७ हजार क्विंटल, तर सहकारी साखर कारखान्यांनी ५८ लाख २८ हजार ६१० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

साखर उताऱ्यात यावेळेस अजिंक्यतारा साखर कारखान्याने आघाडी घेत १२.४५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. त्यापाठोपाठ सह्याद्री कारखान्याला १२.२२ टक्के उतारा मिळाला आहे, तर सर्वाधिक १८ लाख ६० हजार २०० टन ऊस गाळपाद्वारे १६ लाख ३४ हजार ४०० क्विंटल साखरेची निर्मिती करून जरंडेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी साखर कारखान्यांनी साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून, सरासरी ११.५३ टक्के तर खासगी कारखान्यांचा सरासरी उतारा ९.४४ टक्के राहिला आहे.

कारखानानिहाय गाळप व कंसात साखर निर्मिती (क्विंटलमध्ये) :

सहकारी कारखाने : जवाहर श्रीराम कारखाना ४,९५,९९५ (५,६४,६६०), कृष्णा कारखाना १३,४५,४९० (१४,९९,६७०) किसन वीर कारखाना ४,५३,७५९ (५,२१,०४०), देसाई कारखाना २,२४,४१४ (२,६८,७७५), सह्याद्री कारखाना ९,९९,५०० (११,८४,८८०), अजिंक्यतारा कारखाना ७,५५,००० (९,२९,०००) रयत अथणी ३,६६, ४२१ (४,०५,५६०), प्रतापगड कारखाना ३,०१,०५१ (३,४७, ३००) खंडाळा कारखाना १,०४,५४६ (१,०७, ७२५).

खासगी कारखाने : दत्त इंडिया फलटण ८,६२,९५२ (७,७६, ३५०), जरंडेश्वर शुगर १८,६०,२०० (१६,३४,४००), जयवंत शुगर ७, २६,८९० (८,१६,०००), ग्रीन पॉवर शुगर खटाव ३,२२, २५९ (३,५९,७५०), स्वराज्य ग्रीन पॉवर ४,८२,५८४ (४,०२,६६८), शरयू अॅग्रो ४,१३,७९४ (३,३२,४८०), खटाव- माण अॅग्रो पडळ ६,१८,३९९ (६,७०,१४०), शिवनेरी शुगर कोरेगाव १,६८,१३२ (१,५५,९००). (आकडेवारी ७ एप्रिलच्या साखर आयुक्तांच्या अहवालानुसार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT