Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : उसाला पाच हजार रुपये दर द्या, अन्यथा हवाई अंतराची अट रद्द करा

Sugarcane Update : सध्या बाजारात साखरेला कमी किंमत मिळत असल्यामुळे उसाला प्रतिटन पाच हजार रूपये दर मिळत नाही. शेतकऱ्यांना टनाला पाच हजार रुपये मिळायचा असेल, तर साखरेला प्रति किलो ५० रुपये दर करण्यात यावा.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : सध्या बाजारात साखरेला कमी किंमत मिळत असल्यामुळे उसाला प्रतिटन पाच हजार रूपये दर मिळत नाही. शेतकऱ्यांना टनाला पाच हजार रुपये मिळायचा असेल, तर साखरेला प्रति किलो ५० रुपये दर करण्यात यावा. जर साखरेला तो दर देता येत नसेल, तर ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करून साखरेची ट्रक अडवतील, त्या वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड शेतकरी संघटना अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले यांनी दिला.

पुणे व सातारा जिल्ह्यांतील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच या विषयावर चर्चा होऊन ठराव करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे व सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणे गरजेचे आहे. उसाला भाव नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

त्यामुळे आज रोजी चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन पाच रुपये दर मिळाला पाहिजे. शासनाला व साखर कारखानदारांना पाच हजार रुपये दर शेतकऱ्यांना देता येत नसेल, तर दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. तसेच पुणे येथील साखर आयुक्तालय शेतकऱ्यांच्या उसातून पैसे कपात करून उभे केले आहे. पण या इमारतीचे नाव ‘साखर आयुक्त भवन’ असे ठेवले आहे.

मात्र ही इमारत शेतकऱ्यांची असल्यामुळे इमारतीचे नाव ‘साखर आयुक्त भवन’ ऐवजी ‘ऊस आयुक्त भवन’ असे करण्यात यावे. साखर आयुक्तांचे पदही ‘ऊस आयुक्त’ असे करण्यात यावे. तसेच सध्या शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी वाहतूक मंडळास होणारी प्रतिटन १० रुपये प्रमाणे होणारी कपात रद्द होणे गरजेचे आहे. तरी ऊस बिलातून गोपीनाथ मुंडे महामंडळास होणारी प्रतिटन रुपये रक्कम कपात करण्यात येऊ नये.

...या आहेत मागण्या

साखर प्रति किलो ५० रुपयांपेक्षा कमी दराने विकू नये.

कमी दराने साखर विकल्यास साखर कारखान्याच्या बाहेर गाडी पडू देणार नाही.

सी. रंगराजन समितीच्या शिफारशी दर द्या.

मळी, बगॅस, वीज यांचा हिशेब द्या.

इतर पिकांनाही हमीभाव नसल्यामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत.

मुख्यमंत्री महोदय यांनी घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी केली पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT