Rajaram Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sugar Factory : महाडिकांच्या कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र संताप, ऊस तोडीवरून राजकारण होत असल्याचा आरोप

Sugarcane Farmers : कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणावरून गाजलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे.

sandeep Shirguppe

Rajaram Sahkari Sugar : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यांपासून साखर कारखाने सुरू झाले आहेत. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने साखर कारखाने आपल्या कारखान्याला ऊस आणण्यासाठी चढाओढ करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु जिल्ह्यात राजकारणावरून गाजलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. कारखान्यातील सभासदांचा ऊस तोडण्यासा विलंब होत असल्याची तक्रार समोर आली आहे.

छत्रपती राजाराम साखर कारखान्यातील सभासदांच्या ऊसतोडीस विलंब होत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान राजकीय उद्देशाने ऊसतोड करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या कारणी शेतकऱ्यांनी वडणगे निगवे (ता. करवीर) येथील गट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

राजकीय विरोधक म्हणून तोड नसल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा वडणगे सेवा संस्थेचे माजी सभापती बी. आर. पाटील, भीमराव माने यांनी दिला. वडणगे येथील काही शेतकऱ्यांनी याबाबत गट कार्यालयाशी संपर्क साधला. नोंदीनुसार ऊसतोडीची तारीख ओलांडली तरी उसाला तोड मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कारखान्याच्या निवडणुकीत काही सभासदांनी सत्तारुढ गटाच्या विरोधात बाजू घेतल्याने राजकीय विरोधातून येथील काही शेतकऱ्यांच्या उसाला तोड देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. कारखान्याला आमचा ऊस नको असेल तर त्यांनी आम्हाला लेखी द्यावे.

आम्ही आमच्या उसाची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावू मात्र, राजकारण करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला. दरम्यान कारखान्याकडून राजकीय विरोधक म्हणून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जात नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

हुपरी, पट्टण कोडोली भागातूनही तक्रार

राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र जिल्हाभर असल्याने कारखान्याची यंत्रणा तेवढी जोरदार आहे. परंतु निवडणुक काळात सत्ताधाऱ्यांना मदत न केल्याच्या कारणावरून विरोधकांचा ऊस लवकर तोडायचा नाही. विनाकारण शेतकऱ्याला वेठीस धरण्याचे काम फिल्डमन आणि कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचा अनेक तक्रारी येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT