Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Bhimashankar Sahakari Sakhar Karkhana : ‘भीमाशंकर’चे ऊस लागवड धोरण जाहीर

Sugarcane Cultivation Policy : कारखाण्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे ः अंमलबजावणी उद्यापासून

Team Agrowon

Manchar News : दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत संस्थापक-संचालक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२४-२५ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी उद्यापासून (ता. २५) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

श्री. बेंडे म्हणाले, ‘‘ऊस लागवडीसाठी २५ मे २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये ‘को. ८६०३२’, व्हीएसआय ०८००५’, ‘एम. एस.१०००१’, ‘को.९०५७,’ ‘को.व्हिएसआय १८१२१’, ‘पिडीएन १५०१२’, ‘को. एम.११०८२’ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी दिली आहे.

२५ मे २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये ‘को. एम.०२६५’ या जातींच्या लागवडीस परवानगी दिली आहे. तसेच मे २०२४ अखेर ‘को.८६०३२’ या जातीच्या उसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना गाळप हंगाम २०२४-२५ साठी तोड करावयाची असल्यास ऊस गाळपासाठी घेतला जाईल. त्याकरिता उसाची नोंद कारखाना शेतकी विभागीय कार्यालयात करावी.’’

‘‘सभासद व ऊस उत्पादकांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार २५ मे २०२४ पासून वरील ऊस जातीचे बेणे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादकांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा सात-बारा उतारा व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता संबंधित विभागीय गट कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी.

खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसांच्या आत संबंधित गट ऑफिसला येऊन ऊस नोंद करावा. माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरूप जिवाणू खते, ऊस रोपे, बायोकंपोष्ट, ठिबक सिंचन योजना, खासगी ऊस लागवड अर्थसाहाय्य, ऊस पीक स्पर्धा आदी ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा. ऊस नोंदणीबाबत हरकत असल्यास लागवडीपासून २ महिन्यांत हरकत नोंदवावी,’’ असेही बेंडे म्हणाले.

हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोळा केलेले हुमणी किडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो ३०० रुपयांप्रमाणे खरेदी केले जातील. हुमणीचे भुंगेरे गोळा करून एकात्मिक कीड नियंत्रण करावे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी.
- प्रदीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले

MGNREGA Wages : पैसे द्या, पैसे द्या… ‘कुशल’चे पैसे द्या

Agriculture Electricity : शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये

Orange Orchard : बुरशीजन्य देठसुकी, फांदी मर, फळगळ व्यवस्थापन

Agriculture Scheme: केंद्र सरकारकडून ठिबक, तुषार सिंचनासाठी मिळणार ५५ टक्क्यांपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT