Sugarcane Policy : भीमाशंकर साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

Sugarcane Season : आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत लागवड हंगाम २०२३-२४ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी एक जूनपासून सुरू करण्यात आली आहे.
Sugarcane cultivation
Sugarcane cultivationAgrowon
Published on
Updated on

Pune News : आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत लागवड हंगाम २०२३-२४ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी एक जूनपासून सुरू करण्यात आली आहे.

कारखान्याचे संस्थापक- संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या निर्णयानुसार हा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

श्री. बेंडे म्हणाले, की ऊस लागवडीसाठी १ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये को. ८६०३२, कोव्हीएसआय १८१२१, पीडीएन १५०१२, कोएम ११०८२ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.

एक जून २०२३ ते ३० ऑक्टोबर २०२३ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये कोएम ०२६५ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. एक ऑगस्ट २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.

१ सप्टेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये एमएस १०००१, को. ९०५७ या लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.

Sugarcane cultivation
Sugarcane Supply : जीवघेण्या स्पर्धेमुळे ऊस पुरवठ्याची शाश्वती संपली

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार १ जून २०२३ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा सात बारा उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबंधित विभागीय गट कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी.

खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसांचे आत संबंधित गट ऑफिसला येऊन ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशिरा ऊस लागवड नोंद करण्यास आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल.

Sugarcane cultivation
Sugarcane Producer : सांगलीतील शेतकऱ्यांची ऊस उत्पादकतेसह मातीचीही वाढली सुपीकता

कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने, रोखीने राबविण्यात येणाऱ्या ऊस विकास योजनेअंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरूप जिवाणू खते, ऊस रोपे, बायोकंपोस्ट, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, ‘व्हीएसआय’चे मल्टिमायक्रोन्यूट्रिएंट, मल्टिमॅक्रोन्यूट्रीएंट, ह्युमिक अॅसिड, वसंत ऊर्जा, जैविक कीटकनाशक बीव्हीएम, ईपीएन इतरचा पुरवठा, खासगी ऊस लागवड अर्थसाह्य, ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घेण्यात यावा. ऊस पीक स्पर्धेअंतर्गत एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली प्रवेश शुल्क फी रुपये १०० सप्टेंबर २०२३ अखेर भरून नाव नोंदणी करावी.

ऊस पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोळा केलेले हुमणी किडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रुपये ३०० प्रमाणे जून २०२३ अखेर खरेदी केले जाणार आहे. हुमणीचे भुंगेरे गोळा करून एकात्मिक कीड नियंत्रण करावे.

लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी. कारखाना ऊस विकास योजनांची अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com